महायुती सरकारचा कार्यकाळ ठरणार सिंधुदुर्गसाठी सुवर्णकाळ
लाडकी बहीण योजना ठरणार माईलस्टोन
मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी मांडला लेखाजोगा
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग वासिय भाग्यवान आहेत. कारण कोकणचे भाग्यविधाते आदरणीय नारायण राणे साहेब हे केंद्रात खासदार आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत देवगड मधून नितेश राणे साहेब, मालवण कुडाळ मधून निलेश राणे साहेब आणि सावंतवाडीतून केसरकर साहेब हे तीन आमदार लाभणार आहेत. येणारा काळ हा सिंधुदुर्ग वासियासाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. केंद्रात महायूतीच सरकार आहे आणि आता राज्यातही महायुतीचच सरकार येणार आहे. त्यामुळे या दुग्धशर्करा योगाचा फायदा जनतेची विकास कामे करुन घेण्यासाठी होणार आहे. मागील अडीज वर्षात या युती शासनाने जिल्ह्यात शेकडो कोटी रुपयाची विकास कामे केली आहेत. तसेच सर्वासामान्य जनतेसाठी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, वृद्धांसाठी योजना, अपंगासाठी योजना, यासारख्या योजना आणुन हे सरकार जनतेचे आहे हे आश्वासित केले आहे. त्यामुळे या कामात आपला हक्काचा आमदार म्हणून, आणि आपल्या मतदार संघाच्या शाश्वत विकासासाठी निलेश राणे साहेब याना मोठ्या मताधिक्याने विजयी करणे ही काळाची गरज आहे. असे मालवणचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात महेश कांदळगांवकर म्हणाले, मालवण शहरात मागील तीन वर्ष प्रशासकाच्या मनमानी कारभाराबाबत माजी नगराध्यक्ष म्हणून मालवणच्या विकास कामाबाबत, स्वच्छतेबाबत काम होत नसल्याचे जाहीर निवेदन करुनही त्याकडे येथील आमदार, तत्कालीन खासदार यांनी दुर्लक्ष केले. आणि यामुळे मालवणच्या विकास कामासाठी एक आश्वासक नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेत पुन्हा कार्यान्वित झालो, सक्रिय झालो. मी नगराध्यक्ष झालो तेव्हा माझा पक्ष शिवसेना होता, शिवसेना भाजप युती होती आणि चिन्ह पण धनुष्यबाण होत आणि आता पण तसच आहे. त्यामुळे मी माझ्या पक्षाशी प्रतारणा केली नाही.
आमचा लोकप्रतिनिधी कालावधी डिसेंबर २०२१ ला संपल्यानंतर प्रशासकीय कालावधी सुरु झाला. राजकीय घडामोडीमुळे नगरपरिषद निवडणुका पुढे पुढे ढकलत गेल्या. आज मितीस सुमारे तीन वर्ष प्रशासकीय कारभार सुरू आहे. जी विकास कामे आमच्या कालावधीत सुरू झाली होती ती एका प्रशासकाच्या मनमानी कारभारामुळे अद्याप पूर्ण झाली नाहीत. याला स्थानिक आमदार यांचा अंकुश नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले.
सुसज्ज असे भाजी मार्केट, आपल्याच सफाई कर्मचारीसाठी बिल्डिंग, नगर परिषद आवारातील अग्निशमन बिल्डिग, मामा वरेरकर या ठिकाणचा वातानुकूलित मल्टिपर्पज हॉल अशी बरीच कामे अद्याप पर्यंत पूर्ण झालेली नाहीत.
स्वच्छता ही फक्त इव्हेट पूर्ती मर्यादित राहिली आहे. डास फवारणी बंद करण्यात आली आहे. दरवर्षी मे महिन्यात मालवण नगरपरिषदेच्या मालकीच्या सार्वजनिक विहिरींची पाण्याची पातळी कमी झाली की पाणी उपसा करून पाणी शुद्धीकरण केले जात होते ते पण सध्या बंद करण्यात आले आहे. लाखो रुपयांच्या निधीतून कचऱ्या पासून खत निर्मिती च्या मशिन मागील दोन वर्षापासून बंद आहेत. स्वच्छतेच्या नावाखाली जवळपास ३० लाख किमतीचा जेसीबी आज गॅरेज मधे धूळ खात उभा आहे. अश्या प्रकारे मालवणच्या जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे. फोवकांडा पिंपळ या मध्यवर्ती ठिकाणी असलेला रंगीत कारंजा गेले दीड वर्ष बंद आहे.
फिश मार्केट इमारतवरचा मजल्यावरील मच्छीमार बांधवाना गृहीत धरून बांधलेले गाळे आज भाडे ठरविले नसल्याने मागील अडीज वर्षापासून बंद पडून आहेत.
मालवणची नळपाणी योजना, भुयारी गटर योजना या होण्यासाठी आमच्या कालावधी सातत्याने प्रयत्न करत होतो पण मागील अडीज वर्षामध्ये बिल काढण्यापलीकडे कुठलही काम झाल नाही.
मालवण शहराच्या प्रलंबित विकासकामाबद्दल, स्वच्छतेबद्दल, चुकीच्या धोरणामुळे होत असलेल्या आर्थिक नुकसानीबद्दल याअश्या अनेक बाबतीत मागील अडीज वर्ष सातत्याने आवाज उठवूनही प्रशासकाने याबाबत कुठलीही बाब गांभीर्याने घेतली नाही. आणि याबाबत त्यांना विद्यमान आमदार, तत्कालीन खासदार यांच्या कडून हवी तशी समज देण्यात आली नाही. आमदार याना पण सातत्याने खोटी आश्वासन देण्यात आली. कारण सगळेच तसेच होते. अस असताना प्रशासका विरुद्ध आयुक्तांकडे तक्रार करणे आवश्यक असताना मवाळ धोरणाचा त्रास मालवणच्या जनतेला झाला. मालवण शहराची विकास कामे ठप्प झाली. नगरपालिकेच लाखो रूपयाचे आर्थिक नुकसान झाले, शासकीय निधीचा अपव्यय झाला, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. ज्याला मालवणच्या विकासाबद्दल काही घेणंदेण नाही अश्या एका शासकीय अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे आपल्या शहराची वाट लागत असेल तर अश्यावेळी मवाळ धोरण नाही तर अश्या अधिकाऱ्यावर कारवाई ची धमक दाखविणाऱ्या लोकप्रतिनिधीची गरज आहे. आणि ते सर्व गुण आमचे कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे साहेब यांच्या मधे आहेत. एक व्हिजन असलेले नेतृत्व आपल्याला मिळत आहे. रस्ते, वीज, पाणी या दैनदिन कामाच्या पलीकडे जावून स्वछतेसाठी एक अशी यंत्रणा कार्यान्वित करण्याचा त्यांचा मानस आहे जी महाराष्ट्रात एक उदाहरण ठरेल. कॅन्सर हॉस्पिटल, फ़ूड प्रोसेसिंग यूनिट, यूपीएससी, एमपीएससी कोचिंग क्लास अश्या आरोग्य, शैक्षणिक, रोजगारधीमुख योजना हा त्यांचा संकल्प आहे. एक उच्च शिक्षित परदेशात शिक्षण, डॉक्टरेट केलेली व्यक्ती आज आपला लोकप्रतिनिधी म्हणून लाभणार आहे. मागील अनेक वर्ष कुठलेही पद नसताना त्यानी कुडाळ मालवण मतदार संघात पक्षाच्या माध्यमातून कायम कार्यान्वित राहून कोट्यांवधी रुपयाची विकास कामे केली आहेत. वास्तविक एका दैदीप्यमान कुटुंबातील असूनही पराभवाने खचून न जाता कायम जनतेच्या सेवेत कार्यरत राहिले. खरतर सिंधुदुर्ग वासिय भाग्यवान आहेत कारण आज कोकणचे भाग्यविधाते आदरणीय नारायण राणे साहेब हे केंद्रात खासदार आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत देवगड मधून नितेश राणे साहेब, मालवण कुडाळ मधून निलेश राणे साहेब आणि सावंतवाडीतून केसरकर साहेब हे तीन आमदार लाभणार आहेत. येणारा काळ हा सिंधुदुर्ग वासियासाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. कारण केंद्रात महायूतीच सरकार आहे आणि आता राज्यातही महायुतीचच सरकार येणार आहे. त्यामुळे या दुग्धशर्करा योगाचा फायदा जनतेची विकास कामे करुन घेण्यासाठी होणार आहे.
मागील अडीज वर्षात या युती शासनाने कोट्यवधी रुपयाची विकास कामे केली आहेत पण लोकांसाठी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, वृद्धांसाठी योजना, अपंगासाठी योजना, यासारख्या योजना आणुन हे सरकार जनतेचे आहे हे आश्वासित केले आहे.
त्यामुळे या कामात आपला हक्काचा आमदार म्हणून, आणि आपल्या मतदार संघाच्या शाश्वत विकासासाठी निलेश राणे साहेब याना मोठ्या मताधिक्याने विजयी करणे ही काळाची गरज आहे. असे मालवणचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.

