जनतेच्या आशीर्वादाने निलेश राणे मोठया मताधिक्याने विजयी होणार
शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास
मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांचा झंझावाती प्रचार महायुती पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात जनतेच्या मोठया प्रतिसादात करण्यात आला. अनेक ठिकाणी जनतेने ठरवले आहे, आम्हाला विकासाचे व्हिजन असलेले निलेश राणे आमदार हवे. त्यामुळे आमचा पाठिंबा निलेश राणे यांनाच. हा जनतेचा प्रतिसाद व आशीर्वाद निलेश राणे यांचा विजय मोठया मताधिक्याने निश्चित करणारा आहे. सोबतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घराघरात पोहचली आहे. पुन्हा महायुती सरकार येणार तेव्हा ही रक्कम 2100 होणार यामुळे माता भगिनी समाधानी आहे. यांचाही आशीर्वाद निलेश राणे यांना मिळेल. मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे हे निश्चित झाले आहे. असा विश्वास शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे यांनी सोमवारी प्रचाराची सांगता होताना व्यक्त केला आहे.
महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांचा विजय मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. यां मतदारसंघात विकासाच्या माध्यमातून क्रांती घडेल. खासदार नारायण राणे साहेब केंद्रातून निधी आणतील तर महायुती सरकार कडून निलेश राणे निधी आणतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष प्रेम निलेश राणे यांच्यावर असल्याने जास्तीत जास्त विकासनिधी यां मतदारसंघात येईल. असे बबन शिंदे यांनी सांगितले.

