Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

माणगाव खोऱ्यात उबाठाला भगदाड

माणगाव खोऱ्यात उबाठाला भगदाड

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश

निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा व्यक्त केला निर्धार

मालवण | प्रतिनिधी : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मालवण कुडाळ मतदारसंघात गेल्या 15 दिवसात उबाठा गटाला अनेक ठिकाणी भगदाड पाडली. पक्षप्रवेशांचा धडाकाच त्यांनी लावला. मंगळवारी सायंकाळी प्रचाराची सांगता होत असताना माणगाव खोऱ्यात तर त्यांनी आठ ते दहा ठिकाणी पक्षप्रवेशाचा साखळी धमाका केला. शेकडोच्या संख्येने उबाठा पदाधिकारी, महिला पदाधिकारी यांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान, महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार प्रवेशकर्ते यांनी व्यक्त केला आहे.

माणगाव येथे सोमवारी उबाठाचे आदित्य ठाकरे यांनी कॉर्नर बैठक घेतली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी त्या ठिकाणी मोठे धमाके केले. एकाचवेळी आठ ते दहा ठिकाणी उबाठा गटाला भगदाड पाडले. रेकॉर्डब्रेक स्वरूपात हे पक्षप्रवेश घेण्यात आले.

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मानणार मोठा वर्ग सर्वच ठिकाणी आहे. जनतेची मोठी साथ निलेश राणे यांना लाभली आहे. त्या सोबत विरोधकानाही कळून चुकले कि आपणही महायुती सोबत गेले पाहिजे. यां मतदारसंघात निलेश राणे यांच्या नेतृत्वात गतिमान विकास होऊ शकतो. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा खंबीर पाठिंबा आपल्याला मिळू शकतो. तसेच महायुती सरकारने अनेक जनहिताच्या योजना आणल्या. लाडकी बहीण योजनाही आम्हाला फायदेशीर ठरली. असे सांगताना विकासाच्या दृष्टीने उबाठा गटाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रवेश केले.

उबाठा गटातून शिवसेनेत मोठया संख्येने होणारे पक्ष प्रवेश पाहता वैभव नाईक यांचा अपयशी कारभार स्पष्ट होत आहे. जनाता तसेच त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी त्यांना कंटाळले हेच चित्र सगळीकडे दिसून येत आहे.

rapan bottom