शिरवंडे दीपमाळवाडी येथील उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यात शिवसेनेचे उबाठा गटाला धक्के सुरूच आहेत. शिरवंडे दीपमाळवाडी उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे) गटात प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती सुनील घाडीगावकर, सुशांत घाडीगावकर यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश संपन्न झाला.
प्रवेशकर्ते अभिजीत बावकर, प्रकाश बावकर, संदीप बावकर, वैभव वळपी, विठ्ठल दळवी, अशोक बावकर, तुषार बावकर, कृष्णा राऊळ, संतोष बावकर, कृष्णा दळवी व अन्य ग्रामस्थ यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
विकासाचा दृष्टिकोन ठेवून आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती सुनील घाडीगावकर, सुशांत घाडीगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना महायुतीचे शिवसेना उमेदवार निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रवेशकर्ते यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच सुरेश घाडीगावकर, संजय गांवकर, विश्वास गांवकर, दिलीप भाट, हरेश्वर भाट यांसह अन्य महायुती पदाधिकारी उपस्थित होते.

