मच्छीमार सेल,जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांचे मच्छीमार व मत्स्यव्यावसायिकांना आवाहन
मालवण : भारतीय जनता पार्टी सन २०१४ पासून केंद्रात सत्तेत आल्यानंतर मत्स्य व्यवसायाला बळ देण्यासाठी प्रथम नीलक्रांती ,त्यानंतर पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना केंद्र व राज्यस्तरावर राबवत आहे. सदर योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेकडो व्यवसायिकांनी लाभ घेतला आहे. सिंधुदुर्गातील मत्स्य व्यवसायिकांना बळ देण्यासाठी जिल्हा पातळीवर सिंधू रत्न समृद्धी योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये रापन संघांना जाळी खरेदीवर अनुदान, बिगर यांत्रिकी नौकांचे यांत्रिकीकरण, मच्छीमारांना फायबर नौका जाळी व इंजिन खरेदीवर अनुदान, शीत वाहन पुरवठा ,मच्छिमार महिलांना इ स्कूटर शीतपेटीसह पुरविणे, ट्रॉलींग नौकांच्या बळकटी करण करता अनुदान देणे ,बिगर यांत्रिकी नौका यांत्रिकीकरण करणे इत्यादी योजनांचा समावेश आहे.
त्यामध्ये सन 2022-23 मध्ये 270 लाभार्थी यांनी तर 2023- 24 मध्ये 325 लाभार्थी यांनी लाभ घेतला. यामध्ये जवळजवळ दहा कोटी एवढी रक्कम मत्स्य व्यवसायिकांना वितरित करण्यात आली आहे. अजूनही काही प्रस्ताव प्रलंबित असून त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी विशेष निधी आणण्याची गरज आहे. तसेच मोठ्या प्रमाणात नव्याने प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रशासकीय पाठपुराव्याची गरज आहे. केंद्रात खासदार नारायण राणे याचा पाठपुरावा करत आहेत. राज्यात महायुतीचे सरकार आल्यास एकाच विचाराचे सरकार राज्य व केंद्र दोन्ही कडे असल्यामुळे मत्स्यव्यवसायिकांसाठी विविध योजना राबविणे सोपे जाणार आहे .प्रशासकीय परवानग्या बाबत सुसूत्रता तसेच ,निधीची चणचण पण लाभणार नाही .यामध्ये वैयक्तिक लाभार्थ्यांबरोबरच छोट्या मोठ्या बंदरां चा विकास इत्यादी सार्वजनिक उपक्रमांचा पण समावेश आहे. तरी सर्व मत्स्यव्यवसायिकांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे, नितेश राणे, दीपक केसरकर, यांना भरघोस मतदान करून विजयी करूया व महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आणूया,असे आवाहन मच्छीमार सेल,जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

