सौ. निलमताई राणे यांच्या गावभेट दौऱ्यात महिलांच्या उत्स्फूर्त भावना
कधीही हाक मारा आम्ही सोबत असल्याचा सौ. निलमताई राणे यांनी उपस्थितांना दिला विश्वास
आचरा : पळसंब गावात सौ. निलमताई राणे यांनी भेट देत महिला वर्गाशी संवाद साधला. महिला शाखाप्रमुख सौ. दक्षता सावंत व सहकारी यांनी आयोजित केलेल्या यां संवाद बैठकीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी उपस्थितानी पळसंब ग्रामदेवता श्री. आई जयंतीदेवी चरणी नतमस्तक होत आशिर्वाद घेतले. त्यावेळी मानकरी श्री. अनिल पुजारे यांनी निलेश राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होऊदे असे साकडे आई जयंतीदेवी चरणी घातले.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, अस्मिता बांदेकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, शिवसेना महिला उपाजिल्हा प्रमुख सौ. निलम शिंदे, सरपंच महेश वरक, माजी सरपंच सुहास सावंत ग्रामस्थ उपस्थित होते.
महिला शाखा प्रमुख सौ.दक्षता सावंत यांनी सौ. निलम राणे यांचे गावाच्या व महिलांच्या वतीने स्वागत केले.
पळसंब गावातील महिलांना उद्योग लघु उद्योगासाठी राणे परिवार नक्कीच सहकार्य करेल. कधीही हाक मारा आम्ही सोबत आहोत असे मनोगत सौ. निलम राणे यांनी व्यक्त केले. तसेच सर्व महिलांशी त्यांनी संवाद साधला .
त्यावेळी गावातील माजी सरपंच रामकृष्ण पुजारे, रुपेश पुजारे, अक्षय परब, अरुण माने आणि रचना पुजारे, राजश्री दिपाली पुजारे, मनोरमा पुजारे, नम्रता सावंत, सुलोचना सावंत, अमिता परब, निकिता सावंत, मृणाली पुजारे, मनीषा सावंत, मंजीरी पुजारे, उज्वला परब, सेजल लाड, मालती सावंत हर्षदा गोलतकर, अमिता सावंत, अमीता परब, रसिका परब, मालती सावंत, निखिता परब व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
उपस्थित महिलांनी सांगितले, निलेश राणे साहेब यांच्या विजयासाठी मतदारांच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचलो आहोत त्यांच्या विजयांचा एक भाग आम्हाला बनायचे आहे त्यामुळे जास्तीत जास्त मताधिक्यासाठी पळसंब गावातील महिला प्रयत्न करत आहेत. आपण पळसंब गावात भेट दिलात खरच मन भरून आले आहे. त्यामुळे आमचे मनोधैर्य वाढले आहे . त्याचा फायदा मतदानावर नक्कीच दिसेल. निलेश राणेच्या विजयानतंर पळसंब येथे विजयी मेळावा घेवू असे मनोगत पळसंब शाखा प्रमुख सौ. दक्षता सावंत यांनी व्यक्त केले.

