Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

असरोंडी गावातील शिवसेना बुथ अध्यक्ष कमलेश गावडे व भाजप बुथ अध्यक्ष मोहन सावंत यांचा उबाठा गटात प्रवेश

असरोंडी गावातील शिवसेना बुथ अध्यक्ष कमलेश गावडे व भाजप बुथ अध्यक्ष मोहन सावंत यांचा उबाठा गटात प्रवेश

महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांची उपस्थिती

मालवण : मालवण तालुक्यातील असरोंडी गावातील शिंदे गटाचे बुथ अध्यक्ष कमलेश गावडे व भाजप बुथ अध्यक्ष मोहन सावंत यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह निलेश राणे यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाला नाराज होत पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत प्रवेश केला व मशाल हाती घेतली.आ.वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधुन त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.

यावेळी बोलताना प्रवेशकर्ते म्हणाले की ज्या निलेश राणेंनी बाळासाहेब ठाकरेंवर खालच्या पातळीचे आरोप केले त्यांनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पक्षाचे तिकीट दिले हा बाळासाहेबांचा अपमान सहन न झाल्यामुळे आणि राणेंच्या घराणेशाहीला कंटाळून आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगुन राणेंची घराणेशाही कुडाळ- मालवण मधील जनतेने नेस्तानाबूत करण्याचे आव्हान देखील त्यांनी यावेळी जनतेला केले आहे.


यावेळी श्रीकांत घाडी, विलास मेस्त्री,प्रकाश सावंत,उज्वला मोहन सावंत या भाजप-शिंदे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे.


यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख बंडू चव्हाण, विभाग समन्वयक संजय पारकर, बाबा सावंत, प्रशांत सावंत, सरपंच अनंत पोईपकर,उपसरपंच आदित्य सावंत, युवासेना शाखाप्रमुख दयानंद कदम,शाखा प्रमुख सुनील सावंत,दिलीप घाडीगावकर, ग्रा.सदस्य अजय गावडे,ग्रा.सदस्य संदीप सावंत, प्रमोद सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.

rapan bottom