Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

आमच्यासाठी महायुती सरकारने योजना आणली ; लाडक्या बहिणीं सांगतात आमचे मत निलेश राणे यांनाच !

आमच्यासाठी महायुती सरकारने योजना आणली ; लाडक्या बहिणीं सांगतात आमचे मत निलेश राणे यांनाच !

मालवण : महाराष्ट्रात महायुती सरकारने आणलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आली. या योजनेमुळे महिला वर्गात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना महायुतीला पाठबळ देणारी ठरणारी ठरणार आहे.थेट महिलांच्या खात्यात रक्कम जमा होत असल्याने महिला समाधानी असल्याचे चित्र आहे.

लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांच्या प्रतिक्रिया आनंदी आहेत. योजनेच्या माध्यमातून पाच महिन्यात १५०० रुपयाप्रमाणे ७ हजार ५०० रुपये जमा झाले आहेत. महिना दीड हजार रुपये महिलांना आधार देणारे ठरत आहे. अगदी गरीब महिलांपासून ते मध्यमवर्गीय महिला या योजनेचे स्वागतच करत आहेत. योजनेविषयी महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असत्या तर लाडक्या भावाला आमचे मत देणार असल्याचे महिला वर्ग बिनधास्तपणे बोलत आहे.

आमची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. पती मोलमजुरी करतात. दुसरा कोणताच उत्पन्नाचा मार्ग नाही. त्यात मुलगा शाळेत जातो. त्याचा अभ्यास ऑनलाइन येतो. आमच्याकडे मोबाईल घेण्यासारखी परिस्थिती नव्हती. मुलाचा अभ्यास शेजाऱ्यांच्या मोबाईलवर यायचा. त्यामुळे मला दुसऱ्यांवर अवलंबून राहवे लागायचे. त्याचदरम्यान लाकडी बहीण योजना आल्याने मुलाच्या अभ्यासासाठी मला मोबाईल घेणे सहज शक्य झाले. पाच टप्प्याचे माझ्या खात्यात ७५०० रुपये जमा झाले. आता ही रक्कम वाढून 2100 होणार याचाही आनंद आहे.

महागाई झळा सोसाव्या लागत असल्या तरी आमच्या खात्यात जमा होणारी रक्कम माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलांना फायदेशीर ठरली आहे. अडल्यावेळी कुटुंबातील व्यक्तींकडे पैसे मागावे लागायचे. मात्र या योजनेमुळे हक्काचे पैसे खात्यात असल्याने चिंता वाटत नाही. ही योजना यापुढेही सुरू रहावी. मुख्यमंत्री महोदयांनी सुरू केलेली योजना या निवडणुकीत गेमचेंजर ठरेल, अशा बोलक्या प्रतिक्रिया महिला वर्गातून येत आहेत.

rapan bottom