निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार
मालवण | प्रतिनिधी : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा झंझावात मालवण कुडाळ तालुक्यात सर्वत्र सुरु आहे. गावागावात उत्स्फूर्तपणे ग्रामस्थांच्या प्रतिसादात महायुतीच्या माध्यमातून प्रचार सुरु आहे. मालवण तालुक्यातील शिरवंडे गावातही उत्स्फूर्त प्रतिसादात प्रचार फेरी काढण्यात आली. निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार माजी सभापती तथा शिवसेना विभागप्रमुख सुनील घाडीगावकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त केला आहे.
यावेळी सुनील घाडीगांवकर यांसह सुशांत घाडीगांवकर, संजय गावकर, सरपंच चैतली गावकर, उपसरपंच सुरेश गावकर, माजी सरपंच संतोष लाड, सोनू गावकर, प्रकाश गांवकर, हरेश्वर गावकर, विश्वनाथ गावकर, लक्ष्मण गावकर, लऊराज गावकर, संतोष गावकर, ग्राम. सदस्य कैलास गावकर, विजय खांडेकर, तनुजा गावकर, सुप्रिया बाणे, दिलीप भाट, नारायण गावकर, रवींद्र गावकर यांसह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

