महायुतीचे उमेदवार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे यांची प्रमुख उपस्थिती
आचरा : शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात उबाठा गटाला धक्क्यावर धक्के सुरूच आहेत.
महायुतीचे उमेदवार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या उपस्थितीत तोंडवळी उबाठा गटाच्या तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर, सदस्या अनन्या पाटील तसेच तोंडवळी युवासेना शाखाप्रमुख राजा पेडणेकर तसेच अन्य उबाठा कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, माजी सभापती नीलिमा सावंत, तालुका प्रमुख महेश राणे, संतोष कोदे, मंगेश गावकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, राजू मिराशी, गणेश तोंडवळकर, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, अभिजित सावंत, डॉ. प्रमोद कोळंबकर, जयप्रकाश परुळेकर, रावजी सावंत, मनोज हडकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
तोंडवळी गावाचा गतिमान विकासासाठी निलेश राणे हेच योग्य न्याय देऊ शकतात म्ह्णून गाव विकासाच्या दृष्टीने शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे प्रवेशकर्ते यांनी सांगितले. यावेळी सरपंच नेहा तोंडवळकर, सदस्या अनन्या पाटील तसेच तोंडवळी युवासेना शाखाप्रमुख राजा पेडणेकर तसेच सविता पाटील, ज्योती हडकर, सानिका पाटील, सुमित्रा झाड, प्राजक्ता नाईक, भाग्यश्री पाटील, ओकार पाटील, विशाल झाड,सतीश पेडणेकर, प्रसाद आंबेरकर, प्रवीण पाटील, विजय पुजारे, संदीप पेडणेकर, अजित पुजारे,प्रकाश चव्हाण, झकास खवणेकर, प्रमोद तोरसकर, रामचंद्र तांडेल, रामचंद्र मायबा, हेमंत खडपकर, विजय रेवंडकर, तुषार तोरसकर, कीर्तीराज चोडणेकर, विजय खवणेकर, दत्तात्रय मुळे, सखाराम मलबारे, जयश्री पाटील, नितेश नाईक, नेहा पाटील, रवींद्र मयेकर, आनंद आंबेरकर, धनश्री पाटील यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.

