Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

वैभव नाईक यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कधीच मोठे केले नाही

वैभव नाईक यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कधीच मोठे केले नाही

शिंदे शिवसेना कुडाळ मालवण मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे यांचा दावा

विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी जनतेनेच ठरवले निलेश राणेच आमदार

मालवण : वैभव नाईक यांनी गेल्या दहा वर्षात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कधीच मोठे केले नसल्याने आज त्यांना आपल्या कुटुंबियांना घेऊन मते मागण्याची वेळ आली आहे. नाईक यांच्याकडून कार्यकर्त्यांना सन्मान दिला जात नसल्याने अनेक पदाधिकारी आज पक्ष सोडून शिंदे शिवसेनेत येत आहेत. मालवणच्या जनतेने ज्यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडले त्या महेश कांदळगावकर यांनाही आमदार आपल्यासोबत ठेवू शकले नाहीत. ज्या पद्धतीने आमदार आता प्रचार यंत्रणेत सहभागी होत आहेत, तसे ते लोकसभेत विनायक राऊत यांच्या प्रचारात दिसून आले नाहीत. आमदारांनी जनतेची कामेच केली नसल्याने राऊत यांच्या विरोधात मालवण कुडाळची जनता गेली होती. आमदारांच्या पापामुळेच विनायक राऊतांचा पराभव झाला आहे, असा दावा शिंदे शिवसेना कुडाळ मालवण मतदार संघाचे संघप्रमुख बबन शिंदे यांनी केला आहे.

तालुका शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, महिला उपजिल्हाप्रमुख निलम शिंदे, तालुकाप्रमुख महेश राणे, राजा गावकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, प्रशांत शिंदे, मच्छींद्र पाटील, शंकर निकम, कृष्णा चव्हाण, सुधीर चिंदरकर, अंकुश म्हात्रे आदी उपस्थित होते.

ठाकरे शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुख अंजना सावंत यांनी शिंदे शिवसेना प्रवेश केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

निलेश राणे यांनी गेल्या चार वर्षात केलेल्या कामांमुळे जनतेत ठेवलेल्या संपर्कामुळे कुडाळ मालवण मतदार संघात शिवसेनेला पोषक वातावरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या लाडकी बहिण या योजनेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यातूनच आमच्यासाठी मतदारच प्रचार करताना दिसत आहेत. विरोधकांनी ही योजना बंद करण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना यश आलेले नसल्याने आता त्यांच्याकडूनही बहिणींना आधार देण्याच्या जाहीराती केल्या जात आहेत. मात्र त्यांच्या अडीच वर्षाच्या सत्तेच्या कालावधीत कोणतीही योजना बहिणींसाठी राबविली नसल्याने त्यांच्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही, असेही श्री. शिंदे म्हणाले.

यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निलेश राणे विजयी होणार आहेत. मतदार संघात महायुतीचे कार्यकर्ते एकदिलाने आणि एकविचाराने परिवर्तनासाठी सज्ज झालेले आहेत. आमदार वैभव नाईक यांचा पराभव करणे हेच उद्दीष्ट कार्यकर्त्यांचे आहे, असेही श्री. शिंदे म्हणाले.

व्हिजन असलेले नेतृत्व म्हणजे निलेश राणे : महेश कांदळगावकर

निलेश राणे हे व्हिजन असलेले नेतृत्व आहे. आज केंद्रात आणि राज्यात महायुतीचीच सत्ता येणार असल्याने निलेश राणे आमदार म्हणून विधानसभेत असल्यानंतर याठिकाणी रखडलेल्या सर्व विकासकामांना चालना मिळण्याबरोबरच आदर्शवत मतदार संघाची निर्मिती होण्यास मदत होणार आहे. समस्त मालवणकरांनी शहराच्या सर्वांगिण विकासासाठी निलेश राणे यांना संधी दिली पाहिजे. गेल्या दहा वर्षात रखडलेली विकासकामे आपण पहिलेली आहेत. यामुळे आता निलेश राणे यांचा विजय निश्चीत आहे. मात्र मताधिक्यासाठी आपली साथ असणे आवश्यक आहे, असे शिंदे शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर म्हणाले. आपण नगराध्यक्ष असताना शहरातील विकासासाठी अनेक प्रकल्प साकारले होते, मात्र प्रशासकीय कालावधीमध्ये या प्रकल्पांची लागलेली वाताहात थांबविण्यासाठी अनेकदा मी आमदारांकडे दाद मागितली होती, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने मला निर्णय घ्यावा लागला आहे. कचरा डंम्पिग ग्राऊंड याठिकाणी करण्यात आलेली स्वच्छता पाहून तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी चहापाण्याचा कार्यक्रम केला होता. आजच्या परिस्थितीत त्याठिकाणी जाणेही कठीण आहे. कचरा विलगीकरणाच्या मशिनरी बंदस्थितीत आहे. गांडूळ खत प्रकल्प बंद आहेत. खत निर्मीत प्रकल्प बंद आहेत. फवारणी, ब्लिचींग पावडर टाकण्याचीही कामे करण्यात आलेली नाहीत. यासाठी आपण सतत भांडत होतो, असेही श्री. कांदळगावकर म्हणाले. असे एका बाजूला असताना निलेश राणे यांनी आपल्या व्हिजनमध्ये कचरा समस्याकडे गांभिर्याने लक्ष घातलेले दिसून येत आहे.

मालवणच्या विकासाच्या संकल्पना पूर्ण करणारे नेतृत्व निलेश राणे यांच्या रूपाने आपल्याला लाभणार आहे. अशी संधी मिळणार नाही. निलेश राणे यांच्या पाठिशी खासदार नारायण राणे आहेत, कोकणचे भाग्यविधाते म्हणून नारायण राणेंची ओळख आहे. सिंधुदुर्गाचे भाग्य आहेत की निलेश राणे, नितेश राणे, दिपक केसरकर असे तीन आमदार मिळणार आहे. पुढील पाच वर्षात सिंधुदुर्गाचा विकास देश पाहणार आहे, असेही श्री. कांदळगावकर म्हणाले. यामुळे या निवडणुकीत काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठिशी उभे राहणे आवश्यक आहे. मालवणच्या जनतेला हात जोडून विनंती करतो की निलेश राणे यांना मोठे मताधिक्याने विजयी करण्यासाठी मतदान करावे, असेही श्री. कांदळगावकर म्हणाले.

rapan bottom