निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार
मालवण | प्रतिनिधी : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा झंजावात सर्वत्र दिसून येत आहे. चौके गावात श्री भराडी देवी मंदिरात देवतांचे आशीर्वाद घेऊन महायुती पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात प्रचार फेरी काढण्यात आली. निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजा गावडे, जिल्हा सचिव सुरेश चौकेकर, युवासेना पदाधिकारी प्रितम गावडे, सदाशिव गावडे, दिगंबर गावडे राघो गावडे, मयूर गावडे, श्रीकांत दळवी, रघुनंदन राणे, सचिन आंबेरकर, प्रभाकर गावडे, उदय गावडे, अजित गावडे, बुधाजी चौकेकर, प्रविण गावडे, सच्चीदानंद गावडे, सत्यवान गावडे, महेंद्र गावडे साईप्रसाद गावडे, विनायक चौकेकर , मोहन गावडे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

