महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मताधिक्य देण्याचा निर्धार
मालवण : कोळंब भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख श्री मंगेश चव्हाण, बूथ अध्यक्ष गोपाळ बागवे, व विद्यमान कोळंब भाजपा सरपंच सौ. सिया धुरी यांनी उ.बा.ठा गटाला जोरदार धक्का दिला आहे.
उ.बा.ठा. गटाच्या कोळंब ग्रामपंचायत सदस्या सौ. निकिता बागवे व बहुसंख्य ग्रामस्थ यांनी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मालवण तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर, तसेच कातवड, खैदा, आडारी, न्हीवे येथील बहुसंख्य महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघांचे महायुतीचे उमेदवार निलेश नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

