वायंगवडे मध्ये उबाठाला धक्का
संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील वायंगवडे मध्ये उबाठाला धक्का बसला आहे. ग्रा. पंचायत सदस्या मयुरी परब व त्यांचे पती महेंद्र शरद परब व सचिन अनिल घोगळे, राजेंद्र अर्जुन सावंत आणि अनेक ग्रामस्थांनी शिवसेने मध्ये जिल्हा परिषद माजी बाधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
वायंगवडे गावचे माजी उपसरपंच जयवंत परब यांनी हा उबाठाला धक्का दिला आहे. या प्रवेशाने वायंगवडे ग्रामपंचायत मध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद भक्कम वाढली आहे.
महायुतीचे कुडाळ मतदार संघाचे उमेदवार निलेश राणे यांचा झंजावाती प्रचार सुरु आहे. यावेळी जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ग्रामस्थानचे मी धन्यवाद देतो प्रवेश करत्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
यावेळी माजी सभापती राजु प्रभुदेसाई, पोईप ग्रामपंचायत सरपंच श्रीधर नाईक. पोईप माजी सरपंच शावळाराम नाईक, माजी उपसरपंच विलास माधव, पोईप ग्रा. उपसरपंच विष्णू पालव, पोईप ग्रा.सदस्य संपदा सावंत, पोईप ग्रा. सदस्य दिपाली जाधव, पोईप ग्रा. सदस्य संछीदा पालव,पोईप शिवसेना शाखाप्रमुख नारायण राणे, उपशाखाप्रमुख श्रीधर (पिंटू) पालव. वायंगवडे सरपंच सौ. विशाखा सकपाळ, किरण प्रभू,
बाबाजी नाईक दादा नाईक, संतोष (बाबू) पालव, स्वप्नील पोईपकर, सुशील जाधव, माजी उपसरपंच संदिप सावंत, अशोक पालव, आदि उपस्थित होते.

