संस्थेच्या वतीने खा. नारायण राणे यांच्याकडे देण्यात आले पाठिंब्याचे पत्र
मालवण | प्रतिनिधी : जय जवान सुरक्षा रक्षक सहकारी संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार निलेश राणे, नितेश राणे, दीपक केसरकर यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. त्याबाबतचे पत्र संस्था अध्यक्ष अमोल रावले यांच्या वतीने महायुतीचे नेते खासदार नारायण राणे यांना देण्यात आले.
दिलेल्या पत्रात म्हटले आहे, आमच्या संस्थेमार्फत जिल्ह्यात देवगड, कणकवली, वैभववाडी, मालवण, कुडाळ, वेंगुर्ले, दोडामार्ग, सावंतवाडी या तालुक्यामध्ये जिल्हा बँकेत सुरक्षा रक्षक पुरविले आहेत. येत्या निवडणुकी मध्ये आमच्या संस्थे मार्फत महायुतीच्या जिल्ह्यातील तीनही उमेदवार यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे अध्यक्ष रावले यांनी स्पष्ट केले. यावेळी संस्थेचे सचिव रोशन सावंत, संतोष चव्हाण, दयानंद चाव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी महायुती पदाधिकारी बबन शिंदे, महेश कांदळगांवकर, राजा गांवकर, आशिष हडकर, भाई मांजरेकर उपस्थित होते.

