प्रचाराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ किर्लोस येथे पावणादेवी मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.
यावेळी खा. नारायण राणे यांचे बंधू बाबू राणे, माजी उपसभापती राजू परुळेकर, ज्येष्ठ नेते बाळा लाड, शिवसेना विभाग प्रमुख सुनील घाडीगावकर, ग्रा.प. सदस्य प्रविण घाडीगावकर, भाजप युवामोर्चा मालवण तालुका अध्यक्ष अभि लाड, ऍड लक्ष्मण बाक्रे, प्रकाश भावे, कांता भावे, सुदाम गावकर, भास्कर लाड, विनोद भावे, दिलीप घाडी यांसह किर्लोस् गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. किर्लोस गावातून नीलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार गावातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

