Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

गवंडीवाडा : वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक प्रचारात

गवंडीवाडा : वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक प्रचारात

वैभव नाईक यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा निर्धार…

मालवण : महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या विजयासाठी त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक या प्रचारात उतरल्या आहेत. शहरातील गवंडीवाडा प्रभागात त्यांच्या उपस्थितीत ठाकरे शिवसेनेच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. यावेळी 'वैभव नाईक तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा देण्यात आल्या.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ शहरातील विविध प्रभागात प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे. यात विविध प्रभागात वैभव नाईक यांना वाढता प्रतिसाद मिळत असून या निवडणुकीत त्यांना शहरातून मोठे मताधिक्य मिळवून देऊ असा विश्वास युवासेनेचे तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांनी व्यक्त केला आहे.
आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारात आता त्याच्या पत्नी स्नेहा नाईक याही उतरल्या असून त्याही मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटीगाठी घेत आहेत. यात आज त्यांनी शहरातील गवंडीवाडा प्रभागात ठाकरे शिवसेना, युवासेनेच्या माध्यमातून घरोघरी सुरू असलेल्या प्रचारात सहभाग घेतला. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. गवंडीवाडा प्रभाग हा शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षाच्या पाठीशी कायम राहिला आहे. यावेळच्या निवडणुकीतही या प्रभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांना मोठे मताधिक्य मिळवून देऊ असा विश्वास ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी मंदार ओरसकर, रवींद्र तळाशीलकर, संतोष शिरगावकर, बाळू अंधारी, जेम्स फर्नांडिस, आगोस्तीन डिसोझा, पल्लवी तारी, श्रीकृष्ण तळवडेकर, प्रमोद कांडरकर, बाबू डायस, अँथोनी डिसोझा, संतोष देसाई, हेमंत शिरगावकर, महेश देसाई, देवा तोडणकर, संदीप पेडणेकर, भाग्यश्री लाकडे, सोनाली डीचवलकर, दीपा शिंदे, निनाक्षी शिंदे, रसिका तळाशीलकर, नंदिनी कुडाळकर, सौ. लुडबे, चैताली देसाई, ऋत्विक बटाव यांच्यासह अन्य पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

rapan bottom