कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे, सदस्य अजिंक्य पाताडे यांचा मालवण दौऱ्यात कलावंतांनी व्यक्त केल्या भावना
मालवण | प्रतिनिधी : वृद्ध कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे आणि सदस्य अजिंक्य पाताडे यांनी महायुतीचे लोकप्रिय उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ मालवण तालुक्याचा दौरा केला.
अनेक कलावंतांच्या गाठी भेटी घेऊन निलेश राणे यांना मतदान रुपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले. यावेळी अध्यक्ष संतोष कानडे, सदस्य अजिंक्य पाताडे, गोपी लाड बुवा, गुरव बुवा तसेच त्या त्या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
निलेश राणे यांनी नेहमीच कलेचा आणि कलावंतांचा आदर केला. निलेश राणे यांच्या शिफारशीमुळेच अनेक कलावंत यांचे प्रस्ताव मागील कालखंडात मंजूर झाले. असे सांगत अनेक कलावंत यांनी निलेश राणे व महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

