Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

कुडाळ- मालवण मध्ये महायुतीचा विजय निश्चित

कुडाळ- मालवण मध्ये महायुतीचा विजय निश्चित

कुडाळ मालवण युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत यांनी व्यक्त केला विश्वास

मालवण : महाराष्ट्रात महायुतीची म्हणजे सजक विचारांची ,छत्रपती शिवरायांच्या विचारांवर कार्यरत असणारं सरकार येणं ही काळाची गरज आहे. नुसताच आमदार निवडून द्यायचा नाही तर तुमच्या आमच्या राज्यासाठी एक व्हिजन असणारा व्यक्ती म्हणजे निलेश नारायण राणे यांना आपण सर्वांनी निवडून देणं हे आपलं प्रत्येकाचं एक राष्ट्र कर्तव्य म्हणून आपण यावेळी आवर्जून मतदान करायचं आहे आणि इतरांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे.आज आपल्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून निलेश राणे हे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.निलेश राणेच आमदार म्हणून निवडून आले पाहिजेत कारण या मतदारसंघातील रस्ते,पाणी,वीज एवढाच विकास आपल्याला अपेक्षित नसून आज महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या आणि पुन्हा एकदा स्थापन होणार या महायुतीच्या सरकार मधे एक सुशिक्षित,समाजाप्रती तळमळ असणारा आणि एक समृद्ध आणि विकसित मतदारसंघ बनविण्याचे व्हिजन समोर ठेऊन काम करण्याचं ध्येय ठेवणारा आमदार म्हणून निलेश राणे यांना आपण सर्वांनी भरघोस मतांनी निवडून देणं आवश्यक आहे.

निलेश राणे मागील तीन वर्ष कुठल्याही संविधानात पदावर नसताना या मतदारसंघातील प्रत्येक गावा गावातील सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी सोडवण्यांच काम अगदी मनापासून करत आहेत. ज्या मतदारसंघात 'नारायणराव राणे यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात एक आपुलकीचं, कुटुंबातील व्यक्ती म्हणून स्थान आपल्या कर्तृत्वाने मिळवून हा मतदारसंघ एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला त्याच सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचं उद्दीष्ट - ध्येय डोळ्यासमोर ठेवून आज श्री निलेश राणे विधानसभेचे उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभे आहेत. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघातून पहिल्या ५ सर्वोच्च मताधिक्य मिळवलेल्या आमदारांमध्ये आपला आमदार म्हणून श्री. निलेश राणे यांना आपण पाठवून पुढच्या पाच वर्षाच्या आत हा कुडाळ मालवण मतदारसंघ महाराष्ट्रातील एक आदर्श मतदार संघ बनविण्यासाठी त्यांचे हात बळकट करुया. उद्याचा सक्षम, समृद्ध, विकसित महाराष्ट्र बनत असताना आपला हक्काचा आमदार आपण विधीमंडळात पाठवून, आपण राष्ट्र उभारणीत आपलं स्वतःचं भरघोस योगदान मतदानाच्या कर्तव्यातून करावं, असे आवाहन कुडाळ मालवण युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत यांनी केले आहे.

rapan bottom