भाऊ भोगले | बागायत : महायुतीचे उमेदवार डॉ. निलेश राणे यांना आपल्या गावातून मोठे मताधिक्य मिळावे व त्यांचा विजय मोठ्या मताधिक्याने व्हावा यासाठी घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी माळगाव येथील महायुतीचे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन गावातील श्रीदेवी सातेरी , भावई, रवळनाथ, ब्राह्मण देवाचे नामस्मरण करून सर्वांनी निर्धार केला व प्रचाराच्या शुभारंभाचे श्रीफळ फोडले.
यावेळी शक्ती केंद्रप्रमुख श्री निलेश खोत, बूथ अध्यक्ष आनंद शेलार, युवा कार्यकर्ते सुधीर परब ,सिद्धेश खोत ,उमेश न्हिवेकर ,मेघश्याम परब ,हरी चव्हाण, मनोज चव्हाण ,दत्ता सावंत ,कृष्णा जाधव ,कुणाल खोत, संदेश सांडव, गजानन जाधव ,विलास शेलार ,रुपेश कदम ,विश्वनाथ भोगले, गुरुदास परब ,रामदास परब ,सुरेश परब, सुरज धामापूरकर ,हेमंत नाईक उपस्थित होते.

