Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

मतदारसंघातील रोजगाराचा प्रश्न निलेश राणेच मार्गी लावतील!

मतदारसंघातील रोजगाराचा प्रश्न निलेश राणेच मार्गी लावतील!

शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर यांनी व्यक्त केला विश्वास

मालवण | प्रतिनिधी : मालवण कुडाळ मतदारसंघात गेल्या दहा वर्षात रॊजगाराचा प्रश्न गंभीर होत आहे. रोजगार निर्मिती व विकास या दोन्ही बाबतीत येथील आमदार अपयशी ठरले आहेत. त्यामुळे येथील सुशिक्षित युवा वर्ग एका मोठया अपेक्षेने निलेश राणे यांच्याकडे पाहत आहे. या मतदारसंघातील रोजगाराचा प्रश्न उच्चशिक्षित असे कर्तृत्ववान नेतृत्व निलेश राणे हे नक्कीच मार्गी लावतील हा विश्वास युवा वर्ग व त्यांच्या कुटुंबात निर्माण झाला आहे.

एकूणच शेतकरी, कष्टकरी, मच्छिमार, व्यापारी, माता-भगिनी यांसोबत युवा वर्ग नवमतदार यांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता महायुतीचे उमेदवार निलेश राणे बहुमताने विजयी होतील. हा विश्वास जनतेच्या प्रतिसादातून दिसून येत आहे.

निलेश राणे हे व्हिजन असलेले नेतृत्व आहे. खा. नारायण राणे यांच्या प्रमाणे त्यांचाही प्रचंड अभ्यास आहे प्रत्येक गोष्टीची पुर्ण माहिती जाणून घेणे आणि निर्णय देणे हे त्यांचे विशेष गुण आहेत. कुडाळ मालवण मतदारसंघाच्या विकासाचे, रोजगार निर्मितीचे व्हिजन त्यांच्याकडे आहे.

कुडाळ मालवण मतदारसंघ राज्यातील टॉप फाईव्ह मतदारसंघात आणणे हेच लक्ष घेऊन त्यांनी काम सुरु केले आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे धेय्य घेऊन त्यांची सुरु असलेली वाटचाल निश्चितच यां मतदारसंघाला विकासाच्या शिखरावर घेऊन जाईल यात तिळमात्र शंका नाही. असा ठाम विश्वास शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर यांनी व्यक्त केला आहे.

rapan bottom