जनतेतून मोठा पाठींबा मिळत असल्याचा युवासेना पदाधिकाऱ्यांचा दावा
मालवण : महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ गवंडीवाडा येथे करण्यात आला. प्रचारात तरुणांचा मोठा उत्साह दिसून येत असून नाईक यांचा विजय निश्चित असल्याने त्यांना जनतेतून मोठा पाठींबा मिळत असल्याचा दावा ठाकरे सेनेच्या, युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ गवंडीवाडा येथील राममंदिर येथून करण्यात आला. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख मंदार ओरसकर, रवींद्र तळाशीलकर, संदीप पेडणेकर, हर्षल पेडणेकर, महेश देसाई, चौतली देसाई, बाबू राणे, गौरव वेर्लेकर, हितेंद्र हिर्लोस्कर, अमेय देसाई, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जेम्स फर्नाडीस, लक्ष्मीकांत परुळेकर, श्रीकृष्ण तळवडेकर, महेश अंधारी, ऋत्विक बटाव, भाऊ बटाव, शंकर बटाव, राजा बटाव, हरी बटाव, दीपक कदम,
बबन वाघ, राहुल जाधव, सोमनाथ शिंदे, रोशन कांबळी, गजा नेवाळकर यांच्यासह ठाकरे सेना, युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वैभव नाईक यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. घरोघरी प्रचारावर भर देण्यात येत असून जनतेचा मोठा पाठींबा मिळत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

