Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

व्यापाऱ्यांच्या बद्दल अपशब्द ; संजय राऊत यांनी माफी न मागितल्यास मतपेटीतून उत्तर : ललित गांधी

तीव्र आंदोलन करण्याची ही तयारी

मुंबई: व्यापाऱ्यांच्या बद्दल बोलताना ते खोटे आहेत, फसवतात, भेसळ करतात असे आरोप करणाऱ्या संजय राऊत यांनी तात्काळ लेखी माफी न मागितल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना त्याची झळ सोसावी लागेल असा इशारा व्यापारी उद्योजकांची शिखर संस्था असलेल्या "महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर" चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिला.

व्यापारी, उद्योजक हे देशाच्या व राज्याच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य घटक आहेत. अर्थव्यवस्थेत कररूपाने व रोजगार निर्मितीच्या रूपाने सर्वाधिक योगदान देणाऱ्या महत्त्वपूर्ण घटकांच्या बद्दल राजकीय नेत्याकडून बेजबाबदारपणे विधाने होणे हे राज्याची प्रतिमा खराब करणारी आहे. महाराष्ट्रातील व्यापार उद्योग जगताची जगभरात प्रतिष्ठा आहे. अशा बेजबाबदार व बेछूट विधानामुळे तुमची राजकीय पोळी भाजत असेल. परंतु त्यामुळे राज्याचे भरून न येणारे नुकसान होते याची जबाबदारी कोणी घ्यावी.. असा सवाल ही ललित गांधी यांनी या निमित्ताने केला आहे.

कोरोना काळात देशातल्या लोकांना अविरत अखंडपणे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारा व्यापारी हा एक प्रकारे लोकांसाठी जीवनदूत ठरला आहे.
सर्वच सामाजिक क्षेत्रामध्ये सहभागी असणारा व्यापारी, उद्योजक हा समाजातील एक महत्त्वपूर्ण घटक असून या क्षेत्राबद्दल अशा प्रकारचे उद्गार काढणे हे व्यापारी कधीही सहन करणार नाही.

महाराष्ट्रातील एक कोटीहून अधिक व्यापारी, उद्योजकांच्या वतीने "महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स" ने संजय राऊत यांच्या वक्तव्याधा तीव्र निषेध केला असून त्यांनी माफी न मागितल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कोणत्याच उमेदवारांना मतदान करायचे नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.

तसेच त्यानंतरही या बेजबाबदार विधानाबद्दल तीव्र आंदोलन उभारून त्यांना माफी मागण्यास भाग पाडले जाईल असेही ललित गांधी यांनी सांगितले.

संजय राऊत यांच्या विधानाचे महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात पडसाद उमटत असून व्यापारी उद्योजकांच्या याबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. व व्यापारी याविषयी तीव्र आंदोलन करण्याची तयारी करत असल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली.

rapan bottom