Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे उबाठा गटाला धक्के सुरूच

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे उबाठा गटाला धक्के सुरूच

हडी, मसुरे खोतजुवा येथील अनेक उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यात उबाठा गटाला महायुतीचे धक्के सुरूच असून सातत्याने भाजपा, शिवसेनेत प्रवेश होत आहेत. मंगळवारी हडी येथील उबाठा कार्यकर्ते राजेश शेडगे यांनी अनेक सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यासोबत मसुरे खोतजुवा येथील उबाठा गटाचे निलेश खोत यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्ते यांचे स्वागत केले. दरम्यान महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार प्रवेशकर्ते यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख महेश राणे, सूर्यकांत फणसेकर, छोटू ठाकुर, पराग खोत, सुशील शेडगे, जगदीश चव्हाण, पंढरीनाथ मसुरकर यांसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी राजेश शेडगे म्हणाले, मागील काही वर्षे गैरसमजातून आपण ठाकरे गटात गेलो. मात्र विकासाची धमक ही राणे साहेबांकडेच आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातूनच गावाचा गतिमान विकास होऊ शकतो. हे आपण 22 वर्षे राणे साहेब यांच्या सोबत कार्यकर्ता म्हणून काम करताना अनुभवले. मधल्या काळात आपण काही गैरसमजाने बाजूला गेलो मात्र विकासाच्या दृष्टिकोन ठेवून आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे शेडगे यांनी सांगितले. निलेश खोत यांनीही गतिमान गाव विकासाच्या दृष्टिकोनातून शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सांगितले.

मसुरे खोत जुवा येथील उबाठा कार्यकर्ते निलेश खोत यांसह अथर्व खोत, माजी उपसरपंच अनिल खोत, मयूर खोत, दक्षत खोत, प्रणय खोत, जितेंद्र खोत, संदीप खोत, सुयेश खोत, पंडित खोत, नंददीपक खोत, राज खोत तसेच शरद पवार गटाचे ओबीसी तालुका अध्यक्ष नामदेव गिरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर हडी येथील उबाठा गटाचे कार्यकर्ते तसेच मागील ग्रामपंचायत निवडणुकीतीत सरपंच पदाचे उमेदवार राजेश शेडगे यांसह धीरज शेडगे,आदित्य शेडगे, शिवम तोंडवळकर, जगदीश शेडगे, प्रशांत भिसळे, गौरव तोंडवळकर, तेजस शेडगे, यश आचरेकर, कल्पेश आचरेकर, योगेश शेडगे, ओमकार शेडगे, साहिल भिसळे, अनंत सुभेदार, दीपक पाटकर, प्रकाश तोंडवळकर, रंजित पडवळ, सागर दांडकर, सचिन खोत, प्रियंका तोंडवळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अशी माहिती देण्यात आली.

rapan bottom