Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

मालवण मधील उद्धव ठाकरेंच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा !

मालवण मधील उद्धव ठाकरेंच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा !

उबाठा जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे आवाहन

कुडाळ : ठाकरे शिवसेना व महाविकास आघाडीचे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा बुधवार दि.13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. या सभेला शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे.


      येथील ठाकरे शिवसेना शाखेत सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख श्री.पडते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर आदी उपस्थित होते.


      तालुकाप्रमुख राजन नाईक म्हणाले, पक्षप्रमुख ठाकरे यांच्या स्वागतासाठी कुडाळ - मालवण तालुक्यातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मालवण येथे उपस्थित राहणार आहेत. गावागावातून याचे नियोजन करण्यात आले आहे. श्री.ठाकरे यांची सभा महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या विजयासाठी ऊर्जा देणारी ठरणार आहे. त्यामुळे विरोधी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी ही सभा पाहावी आणि नंतरच वैभव नाईक यांच्यासमोर लढण्याचा विचार करावा. वैभव नाईक प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, आणि विजयी झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही उपस्थित राहावे, असा टोला तालुकाप्रमुख नाईक यांनी लगावला.


     आ.नाईक यांनी गेल्या दहा वर्षांत या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. गावागावात विकासकामे झाली आहेत. माजी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून तालुक्यात अनेक ब्रिज, रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. याच ब्रीज व रस्त्याने विरोधक प्रवास करीत आहेत. मात्र अंधभक्त असल्याने विरोधकांना विकास दिसत नाही, अशी टिका तालुकाप्रमुख नाईक यांनी विरोधकांवर केली. आमदार वैभव नाईक घराघरात पोचलेले आमदार आहेत. त्यांचा मतदारसंघात जनसंपर्क मोठा आहे. विकास कामे करण्याची त्यांची धडाडी आहे. त्यामुळेच या मतदारसंघातील जनता त्यांच्या पाठीशी कायम आहे. आमदार नाईक यांना जनतेचा मिळत असलेल्या वाढता पाठिंबा पाहता, विरोधी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नव्हे तर भाजपाच्याच कार्यकर्त्यांचे प्रवेश शिंदे गटात घेत आहेत. अशी टिका तालुकाप्रमुख श्री.नाईक यांनी केली.

    माजी आमदार स्व.पुष्पसेन सावंत यांनी त्यावेळी आमदार असताना दहा धरणे बांधली. एस.एन.देसाई राज्यमंत्री असूनदेखील त्यांनी कुडाळ एमआयडीसी आणली. आ.वैभव नाईक यांनी देखील चार धरणे मंजूर करून घेतली आहेत. आ.नाईक यांनी गेल्या दहा वर्षात मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे पूर्ण केली आहेत. मग नारायण राणे केंद्रात उद्योगमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यासाठी काय केले?. चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ माजी खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाले. आता हे विमानतळ बंद आहे. त्यामुळे खासदार असलेल्या राणेंसमोर हे विमानतळ सुरू करण्याचे आव्हान आहे. त्यांनी आधी बंद झालेले विमानतळ सुरू करावे आणि मगच जिल्ह्याच्या विकासावर बोलावे, असे टिका ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी केली आहे.

rapan bottom