शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेत दाखल
मालवण : शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे यांनी उपस्थितीत आडवली मालडी गावात उबाठा गटाला धक्का दिला आहे. आडवली मालडी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील लाड, माजी ग्रा. प. सदस्य सीमा घाडीगावकर, भिकाजी घाडीगावकर, संदेश घाडीगावकर, दाजी घाडीगावकर, मंगेश पराडकर, जितेंद्र तावडे यांच्यासह अनेक उबाठा कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला.महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठे मताधिक्य आडवली मालडी गावातून देण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर, उपविभाग प्रमुख अश्विन हळदणकर, आचरा शहर प्रमुख महेंद्र घाडी, विजय घाडीगावकर, धनाजी घाडीगावकर, विलास, भगवान लाड, सौ. स्नेहा घाडीगावकर, मालडी गावचे शाखा प्रमुख दशरथ पराडकर, युवा शाखा प्रमुख उमेश साटम, सतीश कदम व शिवसैनिक उपस्थित होते.

