प्रचाराचा शुभारंभ ; पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण मतदारसंघांचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ गावात सोमवारी करण्यात आला. गतिमान विकासाचा दृष्टिकोन आणि जनतेचा भक्कम पाठिंबा या जोरावर निलेश राणे यांचा विजय निश्चित आहे. असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी सरपंच सौ. रश्मी टेंबुलकर, बुथ अध्यक्ष रवी टेंबूलकर, अशोक चव्हाण, दिलीप गोवेकर, शैलेश गोवेकर, चंद्रकांत घाटगे, गुरू सुकाळी, शशी शिंदे, वैष्णवी चव्हाण, निलेश घाटगे, छोटू सामंत, मनोहर घाटगे, संजय कदम, आपी सडवलेकर, राजू सुकाळी, विजय सुकाळी, सत्यवान मालकर, सत्यवान गावठे यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

