कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
आचरा : आचरा मतदार संघातील उबाठाचे कट्टर कार्यकर्ते सुधीर सावंत, साईल धुरी, प्रकाश राणे यांनी शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे, उपतालुकाप्रमुख मंगेश गावकर शिवसेना स्थानिक नेते संतोष कोदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. वैभव नाईक यांना महायुतीचे धक्के सुरूच आहेत. दरम्यान, आचरा पारवाडीतून महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यात आम्हीही प्रयत्नाशील राहू, असा विश्वास प्रवेशकर्ते केला.यावेळी आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर, उपविभाग प्रमुख अश्विन हळदणकर, आचरा शहर प्रमुख मंहेद्र घाडी, ग्रा.प सदस्य चंदू कदम, शाखा प्रमुख अमर पळसंबकर व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

