अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
मसुरे : मालवण तालुका प्रमुख महेश राणे तसेच बांदिवडे सरपंचयुवासेना उपतालुका प्रमुख आशू मयेकर यांनी बांदिवडे गावात उबाठा गटाला खिंडार पाडले आहे.बांदिवडे येथील संतोष सावंत, विठ्ठल मुरकर, भिवा मुरकर, श्रीधर हडकर, भूषण टेंबुलकर, बबन मांजरेकर, प्रसाद माडये, सुरेश माडये, पांडुरंग मुणगेकर, अभिषेक मयेकर, यश मांजरेकर, अवी मुणगेकर, समर्थ मिठबावकर, हर्षद सावंत, तन्मय मयेकर, मयूर मिठबावकर, अक्षय ताम्हणकर, प्रथमेश मेस्त्री, आदित्य मिठबावकर यानी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना विधानसभा प्रमूख बबन शिंदे, तालुका प्रमुख महेश राणे, तालुकाप्रमुख राजा गावकर, छोटू ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर, उपविभाग प्रमुख अश्विन हळदणकर, आचरा शहर प्रमुख महेंद्र घाडी, शिवाजी परब, लीलाधर मुणगेकर, आशिष चेंडवणकर, विकास आचरेकर, कुणाल हडकर आदी शिव सैनिक उपस्थित होते.

