श्री देव रवळनाथ मंदिर येथे देवतांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला प्रारंभ
मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना गोठणे गावातून मोठे मताधिक्य देणार असा निर्धार करत श्री देव रवळनाथ मंदिर येथे देवतांचे आशीर्वाद घेऊन गोठणे गावातील प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात करण्यात आली. जनतेतून असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता निलेश राणे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी यावेळी राजेश हाटले, माजी उपसभापती राजु परुळेकर, गावचे मानकरी, नाना हाटले, गजानन हाटले, बुथ अध्यक्ष संतोष धुरी, घनंश्याम चव्हाण, उपसरपंच बाळा परब, माजी सरपंच विजय घाडी, माजी उपसरपंच राजु लाड, निलेश हाटले, तुषार हाटले, दयाळ हाटले, महेश चिंदरकर, समीर पालांडे, गणेश महाडिक, शैलेश लाड, राजु जगताप, आबू साटम, परेश बाईत आशिष हाटले, महेश साटम, जयवंत पवार उपस्थित होते.

