Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

'त्या' खोडसाळ फोन रेकॉर्डिंगशी माझा काहीही संबंध नाही

'त्या' खोडसाळ फोन रेकॉर्डिंगशी माझा काहीही संबंध नाही

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी स्पष्टच सांगितले…

मालवण : खोडसाळ फोन रेकॉर्डिंगशी माझा काहीही संबंध नसून ठेकेदारी किंवा ठेकेदार या बाबतही माझा कुठे संबंध नाही. अशी स्पष्ट भुमिका महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी मांडली आहे.

सोशल मीडियावर महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्याकडून काही रेकॉर्डिंग व्हायरल करण्यात आली. यात शासकीय ठेकेदार व शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे माझ्याशी संबंधित व्यक्ती यांच संभाषण असल्याचा दावा केला जात आहे. मात्र सदरील खोडसाळ फोन रेकॉर्डिंगशी माझा काहीही संबंध नसून ठेकेदारी किंवा ठेकेदार या बाबतही माझा कुठे संबंध नाही. मी व्यक्तिगत ठेकेदारी करत नाही किंवा कुठल्याही ठेकेदारांशी कुठल्याही शासकीय कामात माझी भागीदारी नाही. आज पर्यंत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मी कधीही कुठल्याही ठेकेदाराकडून अर्थसहाय्य किंवा वस्तूरुपात मदत मागत नाही, मदत घेत नाही किंवा त्यांच्याकडून मदतीची अपेक्षाही करत नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदारांना माझ्या नावावर कुणीही फोन करत असेल किंवा इतर आर्थिक मागणी करत असेल तर त्यांनी याची तक्रार जवळचे पोलीस स्टेशन अथवा जिल्हा पोलीस अधिक्षकांजवळ द्यावी, माझ्या नावाचा वापर करून कुणीही ठेकेदारांकडून किंवा इतर कुणाकडूनही रोख रक्कम अथवा इतर काही मागणी करत असल्यास संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी मी स्वतः पोलीस अधिक्षकांशी बोलून अश्या व्यक्तींवर कारवाईसाठी सूचित करेन. ज्यांचा व्यवसायच ठेकेदारी आहे त्यांनी अश्या प्रकारे माझ्यावर आरोप करण्याअगोदर कुठल्याही शासकीय कामात माझा संबंध आल्यास तो पुराव्यानिशी जाहीर करावा. असेही निलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.

rapan bottom