Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

मंत्री केसरकर यांनी गैरसमज पसरवू नयेत - कुणाल किनळेकर

मंत्री केसरकर यांनी गैरसमज पसरवू नयेत - कुणाल किनळेकर

निलेश जोशी  | कुडाळ : मंत्री दीपक केसरकर यांनी मनसेला गृहीत धरून गैरसमज पसरवू नयेत असा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.


प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुणाल किनळेकर म्हणतात, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याच्या बदल्यात विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देऊन पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक कदापि मदत करणार नाही.


सावंतवाडी मतदारसंघात जनतेने तीन वेळा आमदारकीची संधी दिलेले दिपक केसरकर हे आपल्या सात वर्षाच्या मंत्री पदाच्या कार्यकाळात चष्म्याचा कारखाना, सेट टॉप बॉक्स कारखाना, मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल यासारख्या यांसारख्या अपूर्ण आश्वासनाखेरीज कोणतेही ठोस काम करू शकलेले नाही. याउलट परप्रांतीय मायनिंग व्यावसायिकांना मदत करताना स्वतः कोणते उद्योग आणू न शकलेल्या केसरकरांनी आरवली सागर तीर्थ येथिल नियमानुसार व्यवसाय करणाऱ्या स्थानिक जवळपास २०० वाळू व्यवसायिक कुटुंबांना देशोधडीला लावून परप्रांतीय उद्योजकाला मदत केली, ही यांची ओळख. मतदारसंघातील रोजगार आणि आरोग्य या महत्त्वाच्या प्रश्नांवर अपयशी ठरलेले आमदार राज ठाकरे यांना मानणारा मतदार व महाराष्ट्र सैनिक हे आपल्याकडे वळावे म्हणून अशाप्रकारची वक्तव्ये करत आहे. तसेच यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून कोणतेही आदेश नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीत तटस्थ भूमिकेत आहे. असे कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

rapan bottom