शुभारंभ प्रचाराचा, शुभारंभ परिवर्तनाचा, शुभारंभ कुडाळ मालवणच्या उज्वल भविष्याचा…
मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ पेंडूर येथे श्री देव वेताळ व श्री देवी सातेरी मंदिर येथे श्रीफळ ठेवून करण्यात आला. शुभारंभ प्रचाराचा, शुभारंभ परिवर्तनाचा, शुभारंभ कुडाळ मालवणच्या उज्वल भविष्याचा असे सांगताना निलेश राणे यांना गावातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, ऊबाठा गटातून नुकताच भाजपात प्रवेश केलेल्या ग्रामपंचायत सदस्या सौ. वैष्णवी लाड व विष्णू लाड यांचे स्वागत पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भाजपा कुडाळ मालवण संयोजक बाबा परब, जिल्हा परिषद प्रभारी सतीश वाईरकर, सरपंच नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, आप्पा सावंत पटेल सतीश वाईरकर दीपा सावंत, आतिक शेख, शेखर फोंडेकर, साबाजी सावंत सतीश पाटील बिपिन परब, आशिष हडकर, सत्यवान परब, संदेश नाईक, बापू वायंगणकर, विष्णू लाड, बाबा वायंगणकर, गजानन सावंत, शैलेश परब, कृष्णा पेंडूरकर, विक्रांत नाईक, बाळा भोगले, अरुणा सावंत, सुनीता मोरजकर, वैष्णवी लाड, मनीषा वायंगणकर, अंकिता सावंत, नंदू परब, सुरेंद्र जबडे, अजित वालावलकर, नितीन सावंत, सत्यवान दळवी, कृष्णा वारिक, न्हानु पेंडूरकर, रमेश म्हापणकर, रवी पेंडूरकर, आदित्य नाईक, स्वप्नील सावंत, किशोर राणे, संतोष मेस्त्री, विकास जाधव, कल्पेश मेस्त्री, यश नाईक तसेच इतर ग्रामस्थ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



