संजय माने | पोईप : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवारी सकाळी श्री वेताळ मुंजेश्वर मंदिरात करण्यात आला. पोईप गावातील शिवसेना भाजप कार्यकर्तेंच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून निलेश राणे भरघोस मताधिक्याने विजयी व्हावेत असे साकडे घालण्यात आले. कार्यकत्यानी मोठ्या जल्लोषात होय रे महाराजा 'श्री.वेताळ मुंजेश्वर महाराजा की जय अस म्हणत. निलेश राणे साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है….. अश्या घोषणा दिल्या.
यावेळी पोईप गावचे गाव प्रमुख परशुराम (नाना) नाईक, पोईप गावचे सरपंच श्रीधर नाईक, उपसरपंच विष्णू पालव, पोईप ग्रा. सदस्य मनाली नाईक, कुडाळ मालवण विधान सभा प्रमुख बबन शिंदे, तालुका प्रमुख राजा गावकर, बुथ प्रमुख मिलिंद नाईक. बुथ प्रमुख अजय जाधव. पोईप भाजप कार्यकारणीच अध्यक्ष शंकर (बाळा) पालव, शिवसेना शाखाप्रमुख नारायण राणे उपशाखाप्रमुख श्रीधर (पिंटू) पालव, बाबाजी नाईक, माजी उपसरपंच संदिप सावंत, अशोक पालव, रविंद्र पालव, लवू पालव, महेश पालव, हेमंत पालव, प्रथमेश माधव, बंटी माधव, अनिल पालव, महेंद्र पालव, चंद्रकांत नाईक, वदन नाईक, मनोहर माधव, दिगंबर घोगळे, अनिकेत सावंत, उमेश तावडे, सुर्यकांत चव्हाण, स्वप्नील पालव, प्रकाश जाधव, राजा सांडव आदी उपस्थित होते.

