Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

कुडाळ तहसील कार्यालयात ११ आणि १२ रोजी नागरिकांना प्रवेश बंदी

EVM व VVPAT मशीन सिलींगचे होणार कामकाज

निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ तहसील कार्यालयात दिनांक ११ आणि १२ नोव्हेंबर दिवशी सकाळी ७ वाजल्यापासन सायंकाळपर्यंत विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर वापरण्यात येणारे EVM व VVPAT मशीन मतदानासाठी तयार करणे व सिलींग करण्याचे कामकाज करण्यात येणार आहे. या कालावधीत वरील नमुद ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवणेत येणार असून, सदर ठिकाणी उमेदवार, उमेदवार निवडणूक प्रतिनिधी तसेच उक्त कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे व्यतिरीक्त अन्य व्यक्तीस प्रवेश देण्यात येणार नाही.असे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी कळविले आहे.


भारत निवडणूक आयोग, दिल्ली यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. २६९ कुडाळ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेनुसार दिनांक ११.११.२०२४ ते दिनांक १२.११.२०२४ या कालावधीत सकाळी ०७.०० पासून ते सायंकाळपर्यंत तहसीलदार कार्यालय कुडाळ येथील मध्यवर्ती सभा मंडपामध्ये मतदान केंद्रावर वापरण्यात येणारे EVM व VVPAT मशीन मतदानासाठी तयार करणे व सिलींग करणेचे कामकाज करणेत येणार आहे. सदर कालावधीत वरील नमुद ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवणेत येणार असून, सदर ठिकाणी उमेदवार, उमेदवार निवडणूक प्रतिनिधी तसेच उक्त कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे व्यतिरीक्त अन्य व्यक्तीस प्रवेश देण्यात येणार नाही.
तरी दिनांक ११.११.२०२४ ते दिनांक १२.११.२०२४ या दिवशी तहसीलदार कार्यालय कुडाळ व उपविभागीय अधिकारी कार्यालय कुडाळ येथे निवडणूक कामकाज व्यतिरीक्त इतर कामकाजासाठी नागरीकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे सदर कालावधीत उपविभागीय अधिकारी कार्यालय कुडाळ व तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे काम असल्यास नागरिकांनी संबंधित कार्यालयाकडील कामकाजासाठी येणे शक्यतो टाळून, दि. १३.११.२०२४ रोजी वा त्या नंतरचे कालावधीत उपस्थित राहून आपले कामकाज करावे. तरी सर्व नागरीकांनी वरील सर्व बाबी लक्षात घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे याद्वारे आवाहन करणेत येत आहे.

rapan bottom