महायुतीच्या प्रचाराचा मालवण शहर धुरीवाडा येथे शुभारंभ ; पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण मतदारसंघांचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मालवण शहर धुरीवाडा येथील महापुरुष काजरोबा मंदिर येथे रवीवारी सकाळी श्रीफळ ठेवून करण्यात आला. गतिमान विकासाचा दृष्टिकोन आणि जनतेचा भक्कम पाठिंबा या जोरावर निलेश राणे यांचा विजय निश्चित आहे. असा ठाम विश्वास शहर प्रभारी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक राजन सरमळकर यांसह महायुती पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी व्यक्त केला.
प्रभागात घरोघर प्रचार केला जात आहे. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, कुडाळ मालवण प्रमुख बबन शिंदे, भाजपा शहराध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, महेश सारंग, उमेश नेरुरकर, विकी तोरसकर, बबलु राऊत, बबन परुळेकर, शिवसेना शहरप्रमुख बाळू नाटेकर, वैभव तोंडवळकर, जॉन नरोना, तुरीबाळा परब, महेश कांबळी, दिनू मसुरकर, देवल हडकर, अमर सरमळकर, गणेश चिंदरकर, संजू बिडये, नागेश हडकर, विजय मसुरकर, मृणाली कांदळकर, पुजारे सर, तिरोडकर यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

