Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

तपासणी नाक्यावरील पथकांना अधिक दक्ष राहण्याचे निर्देश

तपासणी नाक्यावरील पथकांना अधिक दक्ष राहण्याचे निर्देश

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची इन्सुली तपासणी नाक्याला भेट

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी इन्सुलि येथील तपासणी नाक्याला (चेक पोस्ट) भेट देऊन कार्यालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व तपासणी नाक्यावरील पथकांनी अधिक दक्ष राहण्याचे निर्देश दिले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एम डी शेवरे व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आढावा बैठक घेऊन अडीअडचणी समजून घेतल्या. जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या चेक पोस्टवरील पथकाने दक्ष राहावे, गोवा राज्यातून येणारे अवैद्य मद्य यावर कटाक्षाने लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थितांना दिले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री शेवरे यांनी विभागाने केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले आचारसंहिता लागू झाल्यापासून ते ९ नोव्हेंबर पर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण ४४ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यामध्ये १० वाहनासह एकूण ६९ लाखाचा मुद्देमाल जप्त करून ४४ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच ०१ एप्रिल २०२४ ते आतापर्यंत ३८८ गुन्ह्यात ४ कोटी ८४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती श्री शेवरे यांना यावेळी दिली.

rapan bottom