Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

महाविकास आघाडीचे सरकार येणार!

महाविकास आघाडीचे सरकार येणार!

कुडाळ, मालवण मतदार संघाच्या विकासासाठी आमदार वैभव नाईकच हवेत!

महाविकास आघाडीच्या मेळाव्यात माजी खा. विनायक राऊत यांनी व्यक्त केला विश्वास

मालवण : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे १६० आमदार निवडून येतील. याची सुरवात कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांच्या विजयाने होईल असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला.

वायरी येथील आर. जी. चव्हाण मंगल कार्यालयात सायंकाळी महाविकास आघाडीचा मेळावा झाला. यावेळी आमदार वैभव नाईक, गौरीशंकर खोत, भाई गोवेकर, संजय पडते, श्रेया परब, पूनम चव्हाण, दिपाली शिंदे, जेम्स फर्नांडिस, मंदार शिरसाट, हरी खोबरेकर, नितीन वाळके, मीनाक्षी शिंदे, बाळ महाभोज, मंदार केणी, बाळू अंधारी, श्रीकृष्ण तळवडेकर, प्रमोद कांडरकर, उमेश मांजरेकर, श्वेता सावंत, ममता तळगावकर, प्राची माणगावकर, उल्हास तांडेल, मंदार गावडे, व्हीक्टर डांटस, डॉ. विश्वास साठे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. राऊत म्हणाले, सध्याचे सत्ताधारी हे भ्रष्टाचारी असून त्यांना त्यांची जागा या निवडणुकीत जनता दाखवेल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यापासून कोण रोखू शकत नाही. या मतदार संघाच्या विकासासाठी आमदार वैभव नाईकच हवेत. त्यामुळे त्यांच्या विजयासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने काम करत यश मिळवा असे आवाहन श्री. राऊत यांनी केले.


वैभव नाईक म्हणाले, विरोधक सांगत आहेत की वैभव नाईक यांनी मतदार संघात काय काम केले. मी जर काम केले नाही तर मग तुम्हाला घरोघरी फिरण्याची वेळ का आली? मुलाला मते मागण्यासाठी खासदाराना मतदार संघात फिरावे लागते हेच माझे काम आहे. शहरात अद्ययावत जेटी, नळपाणी योजना, छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर सुशोभीकरण यासह अनेक विकासात्मक कामे मार्गी लावण्यात आली आहेत. मच्छिमारांना अनेक योजनेचा लाभ मिळवून दिला. फयान, तोक्ते वादळात नुकसानग्रस्ताना आर्थिक मदत मिळवून दिली.


आजचे सत्ताधारी हे भ्रष्टाचारी आहेत हे महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर दिसून आले. पुतळा कोसळल्या नंतर आमच्यावर आरोप करत आठ दिवसात पुरावे देतो असे सांगितले गेले. मात्र ते पुरावे देऊ शकले नाहीत. कारण यात त्यांनीच भ्रष्टाचार केला असल्याचे निदर्शनास आले. पुतळा कोसळल्यानंतर राजकोट येथे जी अरेरावी करण्यात आली ती मालवणवासियांनी बघितली आहे. त्यामुळे येथील जनता या भ्रष्टाचारी लोकांना थारा देणार नाही. वादळाच्या काळात, कोरोना काळात हे विरोधक कुठे होते? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. येत्या १३ तारखेला सायंकाळी चार वाजता टोपीवाला हायस्कुल येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेस सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री. नाईक यांनी यावेळी केले.
यावेळी गौरीशंकर खोत, मंदार केणी, उल्हास तांडेल, व्हीक्टर डांटस, महेश जावकर, बाळू अंधारी, पूनम चव्हाण यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन नितीन वाळके यांनी केले. हरी खोबरेकर यांनी आभार मानले.

rapan bottom