नाभिक समाज तालुकाध्यक्षा दीपा शिंदे यांनी मांडली रोखठोक भुमिका
मालवण : कालपरवा नाभीक समाजाच्या जिल्हाध्यक्षांनी कार्यकारीणीची बैठक न घेता, नाभीक समाजबांधव सोडाच कार्यकारीणी सदस्यानाही विश्वासात न घेता परस्पर महायुतीला पाठिंबा घोषीत केला आहे. नाभीक समाजाचे जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण यांनी समाजाच्या पदाचा उपयोग स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी करू नये.
मी स्वतः नाभीक समाजाची महिला तालुका प्रमुख म्हणून कार्यरत आहे. मात्र राजकारणात मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निष्ठावान शिवसैनिकही आहे. आणि महिला तालुका संघटकही आहे. मी माझे स्वतःचे वैयक्तिक मत तर वैभव नाईक यांना देणार आहेच, पण माझ्या संपर्कातील प्रत्येकाला वैभव नाईक यांनाच मत द्यायचा आग्रह करणार आहे.
समाजातील सर्व बांधवांना लोकशाहीचा अधिकार आहे. आणि संपूर्ण नाभिक समाज सुशिक्षित, विचारी आणि सुज्ञ सुद्धा आहेत. त्यामुळे जगदीश चव्हाण, रूपेश पिंगुळकर यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी संपूर्ण नाभिक समाजाला वेठीस धरू नये. संपुर्ण मतदार संघातील नाभीक समाजबांधव निष्ठेचे पाईक असलेल्या वैभव नाईक यांच्याच सोबत राहील याची मला खात्री आहे. अशी भुमिका दीपा शिंदे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे मांडली आहे.

