Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

कोकण हा माझा श्वास : खा. नारायण राणे

कोकण हा माझा श्वास : खा. नारायण राणे

मालवण तालुक्यात गावभेट दौऱ्यात ग्रामस्थांशी साधला संवाद : ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महायुतीचे उमेदवार निलेश राणे मोठया मताधिक्याने विजयी होणार ; जनतेचा निर्धार

संजय माने | पोईप : कोकण हा माझा श्वास आहे. येथील जनता हे माझे कुटुंब आहेत. या भागाचा सर्वांगीण विकास, गावात अधिकाधिक सुविधा निर्माण करणे, येथील दरडोई उत्पन्न वाढवणे हा माझा ध्यास आहे. याचं प्रयत्नातून निलेश राणे ही सातत्याने कुडाळ मालवण तालुक्यात काम करत आहेत. जनतेतूनही मोठा प्रतिसाद मिळतं आहे. हे पाहता विधानसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा विजय निश्चित असून हा विजय मोठया मताधिक्याचा असेल असा ठाम विश्वास माजी केंद्रीय मंत्री भाजपा खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, विरोधकांचा खास राणे शैलीत त्यांनी समाचार घेतला. राहुल गांधीला काही समजत नाही. उद्धव ठाकरे अडीज वर्षे मुख्यमंत्री असताना दोन दिवस मंत्रालयात गेले. ते विकास काय करणार. तीच स्थिती येथील मतदारसंघात आहे. दहा वर्षे विकास ठप्प आहे. त्यामुळे जनतेनेच आता बदल करणार हे निश्चित केले आहे. असे खा. राणे म्हणाले. तर केंद्र व राज्य सरकारचे विशेष कौतुक खा. राणे यांनी करताना जनहिताच्या योजना राबवणारे व गतिमान विकास करणारे हे सरकार लोककल्याणकारी आहे. असे ते म्हणाले.

खा. नारायण राणे यांनी मालवण तालुक्यातील चाफेखोल, पोईप गावांना भेट दिली. ग्रामस्थांशी संवाद साधला. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. असे आवाहनही खा. नारायण राणे यांनी केले. या बैठकानां ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गांवकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर, माजी सभापती राजु प्रभुदेसाई, चाफेखोल गावचे उपसरपंच रविंद्र जाधव, भाजपा महिला ओबीसी तालुकाध्यक्ष पुजा वेरलकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवासेना जिल्हा पदाधिकारी प्रितम गावडे, दया प्रभूदेसाई, विभागप्रमुख अल्पेश निकम, यांसह अन्य पदाधिकारी चाफेखोल येथे उपस्थित होते. तर पोईप सरपंच श्रीधर नाईक, शिवसेना शाखाप्रमुख स्थानिक पदाधिकारी नारायण राणे, स्वप्निल पोईपकर, बाबाजी नाईक, विभाग प्रमुख कमलेश प्रभू, सुशिल जाधव, लक्ष्मण जाधव, श्रीधर पालव, मिलींद नाईक, शंकर पालव, भरत माने, जयवंत परब, संदिप सावंत, अजय जाधव, अनिकेत सावंत, गोविंद पालव, संदिप जाधव, राजेंद्र धुरी, नम्रता धुरी, सुधाकर पोईपकर, चंद्रकांत नाईक, विश्वनाथ नाईक, उमेश तावडे, पार्थ पालव, रमेश पालव आदी उपस्थित होते.

rapan bottom