मालवण : मालवण धुरीवाडा प्रभाग १ मधून श्रीकृष्ण मंदिरातून महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. प्रचारासाठी धुरीवाडा परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. अशी माहिती माजी नगरसेवक तथा ठाकरे शिवसेना जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांनी दिली.
यावेळी माजी नगरसेविका दर्शना कासवकर, शहर प्रमुख बाबी जोगी, चेतन खोत, बाळू परुळेकर, गणपत आडीवरेकर,पद्माकर पराडकर, रश्मी परुळेकर, मंगेश वेगुर्लेकर, प्रथमेश राऊत, शशी खोत, प्रदीप मयेकर, दिनकर मयेकर, राजू पराडकर, नाना सारंग, गोविंद खोर्जे, गणपत खोर्जे, चंदा जोशी, बाबू खडपे, अण्णा खोर्जे, दाजी जोगी, बबया कवीटकर, दिलीप हडकर, विलास जोशी, किशोर तळाशीलकर, नागेश वेंगुर्लेकर, सई वाघ, प्रदीप मयेकर, शरद धुरी, अरुण परब, अरविंद फर्नांडिस, शरद धुरी, किशोर ताळशिकेर, प्रल्हाद चिंदरकर, वासू गावकर, संतोष पांगे, वीरेंद्र पाटील, बाळू खोत, विलास परुळेकर, बबन कांबळी व इतर नागरिक उपस्थित होते.

