Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

मालवण येथे मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

मालवण येथे मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

अग्निशमन, घंटागाडी, ट्रॅक्टरच्या ताफ्यासह भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन

मालवण : विधानसभा निवडणुका आणि लोकशाहीमध्ये नागरिकांच्या सार्वत्रिक आणि प्रबुद्ध सहभागासाठी; निवडणुकीत माहितीपूर्ण आणि नैतिक पद्धतीने मतदान करण्यासाठी प्रबोधन करून मतदारांना सक्षम करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मा. श्री. अनिल पाटील (भा.प्र.से.) यांच्या संकल्पनेतून मालवण नगरपरिषद क्षेत्रात मतदार जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास मालवण नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे, मालवण तहसीलदार श्रीम. वर्षा झाल्टे, निवासी नायब तहसिलदार श्री. गंगाराम कोकरे, पोलीस उप-निरीक्षक श्री. संदीप खाडे, वाहतूक नियंत्रण पोलिस गुरुप्रसाद परब, दादा वेंगुर्लेकर मातृत्व फाऊंडेशन यांच्यासह या मतदार जनजागृती मोहिमेत शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्था, युवा मतदार, महिला मतदार, व नागरिक सहभागी झाले होते.

२० नोव्हेंबर रोजी २६९- कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या मतदानात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घेऊन लोकशाही बळकट व्हावी या उद्देशाने SVEEP(Systematic Voters Education & Electoral Participation) अंतर्गत मालवण नगरपरिषदेतर्फे या मतदान जनजागृती कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मतदार जनजागृतीसाठी अग्निशमन, घंटागाडी, ट्रॅक्टरच्या ताफ्यासह भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीची सुरुवात मालवण शहरातील देऊळवाडा नाका येथून झाली व पुढे एसटी स्टँड-भरडमार्गे बाजारपेठेतून फोवकांडा पिंपळ येथून पुढे नगरपरिषद येथे रॅलीची सांगता करण्यात आली. सदर रॅलीस शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व रॅली पाहण्यासाठी गर्दी केली. मोटारसायकल रॅली पूर्ण झाल्यानंतर सर्व उपस्थितांना मतदान शपथ देण्यात आली. यावेळी मतदान जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहीम, मतदार सेल्फी पॉईंट इत्यादी माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली. मतदान जनजागृतीपर घोषणा, जनजागृतीपर गीते यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर व्यापून गेला. तसेच मतदार जनजागृतीसाठी पथनाट्य, नगरवाचन मंदिर व मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वकृत्व स्पर्धा, स्विमिंग स्पर्धा अशा विविध स्पर्धासहित कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आल्याचे मालवण नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी सांगितले व सर्व मतदारांना 100% मतदान करण्याचे आवाहन त्यांनी सर्व मतदारांना यावेळी केले.

rapan bottom