कुडाळ मालवण ठाकरे शिवसेना युवतीसेना प्रमुख सौ. शिल्पा यतीन खोत यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया
मालवण : मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे ही सत्ताधाऱ्याचे अनावधान, बेफिकिरी की भ्रष्टाचार अशा चर्चा शिवप्रेमींना व सामान्यांना कराव्या लागणे यासारखी सत्ताधाऱ्याची नामुष्की ती कोणती, कारण बेफिकिरी, अनावधान व भ्रष्टाचार या तीनही गोष्टी स्वराज्यासाठी बाधक असतात. यापैकी काहीही घडले तरी त्याची नैतिक जबाबदारी घेत 'सत्तेतून पाय उतार होणे आणि जबर दंडाला सामोरे जाणे' यालाच छत्रपती शासन म्हणतात. लाखो जन्म घेतले तरी छत्रपतींचे उपकार फेडणे कोणालाच शक्य नाही. परंतु त्यांच्याशी निगडीत वस्तू, वास्तू, स्मारक किंवा काहीही उभारणे, जपणे हे आद्य कर्तव्य आहे. ते कर्तव्य कोणाला पार पाडता आले नाही हे जनतेने उघड डोळ्याने पाहिले. त्यासंदर्भात वक्तव्ये, कारवाई वगैरे दिशाभूल करणारी होती की दिखावे होते हे जनतेला माहिती आहे.
छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवण नगरीत छत्रपतींचा पुतळा उभारण्याचे काम शीघ्र गतीने करण्यामागील उद्देश हे शिवशक्तीचा आदर करणारे नव्हते. त्याच्या उभारणीच्या प्रक्रियेतील पारदर्शकता ही जाणत्या राजाच्या सदरेवरील कार्यालयीन नितळतेची नव्हती. अख्ख्या जगात छत्रपतींचे लाखो पुतळे आहेत परंतु कोसळला मात्र राजकोट वरील पुतळा, छत्रपतींचा पुतळा 'कोसळला' हे शब्द लिहिताना सामान्य मराठी माणसाची व शिवप्रेमींची किंवा उच्चारताना सुद्धा बोटं किंवा जीभ कापते पण भ्रष्टाचार केलेल्या किंवा बेफिकिरी दाखवलेल्या व्यक्ती घटकांना व यंत्रणांना त्याचे सोयर सुतकही आहे की नाही हा सवाल आहे. अशी भूमिका कुडाळ मालवण उबाठा युवती सेना प्रमुख शिल्पा खोत यांनी मांडली आहे.
छत्रपतींच्या अस्मितेला जपू पाहणारी व जगदंबेच्या धगधगत्या मशालीची एक वात म्हणजे आमदार वैभव नाईक. किल्ले सिंधुदुर्ग वर छत्रपतींच्या सन्मानाचा सन्मान करत सिंहासन जडवलेला एक मावळा, छत्रपतींच्या रयतेसाठीच्या सुसंस्कृत अभ्यासू धोरणात्मक स्वराज्याचा दीपस्तंभ ज्याला दिसला तो आश्वासक निष्ठावान म्हणजे आमदार वैभव नाईक. 'सत्ताकारणासाठी वाट्टेल ते' अशा मनोवृत्तीला ठामपणे नाकारत जनतेची शांती, समाधान व प्रगती कशात आहे याचा साधक बाधक विचारवंत म्हणजे आमदार वैभव नाईक. मुद्द्यांचे भांडवल करुन गाजावाजा करण्यापेक्षा त्या मुद्द्यांवर सर्वांना एकत्रित करत समाधान शोधणारे एक तंत्र ज्या योद्ध्याने जाणले असा योद्धा म्हणचे आमदार वैभव नाईक, अशी प्रतिक्रिया उबाठा कुडाळ मालवण युवती सेना प्रमुख शिल्पा खोत यांनी दिली आहे.
युवती, स्त्रिया तथा महिलांच्या सुरक्षित निर्भयतेसाठी 'भाऊबंधाचा धागा' ज्याला घट्टपणे बांधला जातो अशा आमदार वैभव नाईक यांच्या राजकीय अष्टपैलुत्वासाठी मशालीवर मोहोर उमटवण्यासाठी कुडाळ - मालवण मधील प्रत्येक निष्ठावंत सुसंस्कृत मन आतुर झालं आहे, असे देखील सौ. खोत यांनी म्हटले आहे.

