आम्ही उबाठा मध्ये होतो ; भाजपा मधून आमचा प्रवेश झाला ही दिशाभूल उबाठा पदाधिकाऱ्यांनी करू नये : प्रवेशकर्ते यांनी केले स्पष्ट
बुधवळे : बुधवळे येथील उबाठा गटाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी गुरुवारी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या नंतर ठाकरे युवासेना उपतालुका समन्वयक बंडू गावडे यांनी हे प्रवेशकर्ते मुळ भाजपाचे असल्याचा दावा केला होता.
यावर पलटवार करताना प्रवेशकर्ते माजी ग्राप सदस्य उल्केश येरम यांनी केला. ते म्हणाले माझ्या सहित माजी शाखा प्रमुख समीर घागरे, महादेव घागरे, आकाश परब, अशोक शिर्सेकर, साहिल शिर्सेकर, किरण जोईल, समीर मुणगेकर, रणजित घागरे, विघ्नेश येरम, अविनाश सरमळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना महायुती माध्यमातून गाव विकास दृष्टीने तसेच खा. नारायण राणे, महायुती उमेदवार निलेश राणे यांच्या माध्यमातून गतिमान विकास होणार या ठाम विश्वासातून आम्ही जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्यप्रणाली व विश्वासाने शिवसेनेत प्रवेश केला. असे उल्केश येरम यांनी सांगितले.
आम्ही शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे विभागातील उबाठा पदाधिकारी नेत्यांची दिशाभूल करत त्यांना खुश करण्यासाठी आम्ही भाजपाचे असल्याचे भासावत आहेत. सातत्याने होणाऱ्या पक्ष प्रवेशामुळे पायाखालची वाळू यांच्या सरकली असे येरम म्हणाले.

