शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती
देऊ घाडीगांवकर यांची युवासेना शाखाप्रमुख पदी नियुक्ती
मालवण : असरोंडी येथील उबाठा युवा कार्यकर्ते यांनी शनिवारी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
विनायक सावंत, देऊ घाडीगावकर, प्रियेश घाडीगावकर, मयूर घाडीगावकर व इतर कार्यकर्ते यांनी प्रवेश केला. दरम्यान देऊ घाडीगांवकर यांची युवासेना शाखाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती युवासेना तालुकाप्रमुख मिहीर राणे यांनी दिली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख महेश राणे, मंगेश गांवकर, मंदार लुडबे, राजु बिडये, मकरंद राणे, मिहीर राणे, चंद्रकांत गोलतकर, हर्षद हातणकर, प्रथमेश सावंत, विराज सावंत, प्रणय राणे उपस्थित होते.

