निलेश राणे यांचा विजय निश्चित
महायुतीच्या प्रचाराला मालवण शहरात उद्यापासून सुरवात
मालवण : महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा झंजावात मतदारसंघात सुरु आहे. मालवण शहरात पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून घरोघर प्रचाराला शनिवार पासून प्रारंभ केला जाणार आहे. असे भाजपा मालवण शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी सांगितले.
कोकणात महायुती भक्कम आहे. महायुतीचे सर्व उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी होतील. कुडाळ मालवण मतदारसंघातून निलेश राणे यांचा विजय निश्चित असून पक्ष नसलेले उबाठा गटाचे उमेदवार वैभव नाईक यांचा पराभव करणार हे जनतेने ठाम निश्चित केले आहे. मशाल विझणार आहे. वैभव नाईक यांना पराभव दिसू लागल्याने पत्नी तसेच वृद्ध आईलाही प्रचाराला उतरवावे लागत आहे. असे भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी सांगितले.

