Thursday, 29 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

पावशी सरपंच वैशाली पावसकर यांचा सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश

पावशी सरपंच वैशाली पावसकर यांचा सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश

निलेश राणे यांनी महामार्ग सर्व्हिस रोड प्रश्न सोडविल्याने प्रवेश पक्ष

निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यातील पावशी गावामध्ये गेली दहा वर्ष महामार्ग लगत सर्विस रस्त्याची मागणी माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याकडे करून सुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केला. मात्र माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे ही मागणी केल्यावर आठ दिवसात हा प्रश्न निकाली काढला. त्यामुळे आम्ही सर्वांनी भाजप पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित केले. असे पावशी सरपंच वैशाली पावसकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर सांगितले.


पावशी येथे कुडाळ तालुका भाजप पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये भाजपचे खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत सरपंच वैशाली पावसकर यांच्यासह अनेक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी प्रवेशकर्ता सरपंच वैशाली पावसकर यांनी सांगितले की, पावशी गावामध्ये आम्ही गेले अनेक वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून काम करत आहोत या गावातून चौपदरीकरण महामार्ग झाला आहे या महामार्ग लगत ग्रामपंचायत कार्यालय ते लिंग मंदिर या परिसरामध्ये सर्विस रस्त्याची आवश्यकता होती याबाबत माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांना वारंवार सांगितले पण आम्हाला आश्वासना पलीकडे काही मिळालं नाही. अखेर आम्ही माजी खासदार निलेश राणे यांच्या निदर्शनास हा प्रश्न आणला त्यांनी अवघ्या आठ दिवसात हा प्रश्न मार्गी लावला अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडविला. कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या अशा नेतृत्वाच्या मागे उभे राहण्याचे आम्ही ठरवले त्यामुळे आम्ही सर्वांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. येत्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना गावातून मोठे मताधिक्य देऊ असे सांगितले.

rapan bottom