Thursday, 29 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

राजन तेली यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घ्यावी : युवा नेते प्रथमेश तेली

राजन तेली यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घ्यावी : युवा नेते प्रथमेश तेली

अफवांवर विश्वास ठेऊ नये : तेली

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विरोधकांकडून चुकीची माहिती पसरविली जात आहे. मात्र कोणीही अफवांवर विश्वास न ठेवता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन तेली यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घ्यावी. त्यासाठी निवडणुकीला सामोरे जाताना काहीही कमी पडू देणार नाही आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. महाविकास आघाडीची एकजूट दाखवून देऊया अशी भावनिक साद युवा नेते प्रथमेश तेली यांनी कार्यकर्त्यांना घातली आहे.


याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे त्यात असे म्हटले आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सावंतवाडी मतदारसंघात विरोधकांकडून आमच्याबद्दल चुकीची माहिती जाणीवपुर्वक पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.मात्र महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता महाविकास आघाडीचे उमेदवार श्री तेली यांना निवडून आणण्यासाठी काम करूया. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहोत. स्थानिक पातळीवरील उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार कोणीही करू नये. या मतदारसंघात ठाकरे,पवार आणि गांधी हेच उमेदवार आहेत असे समजून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

तर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना विश्वासात घेऊन त्यांचा मानसन्मान केला जाईल. निवडणुकीतील हे युद्ध जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना लागणारे सहकार्य केले जाईल आणि या ठाकरे शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन या निवडणुकीला सामोरे जाऊ अशी हाक मारत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात नक्कीच आपल्याला यश मिळणार आहे असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

rapan bottom