Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

माझी निवडणूक हा मागील १५ वर्षात उपेक्षित ठेवलेल्या जनतेचा लढा

माझी निवडणूक हा मागील १५ वर्षात उपेक्षित ठेवलेल्या जनतेचा लढा

माझ्यावरील पेड बदनामीकारक व्हिडीओना उत्तर देण्यात वेळ घालवणार नाही : अपक्ष उमेदवार विशाल परब

बदनामी मागच्या सूत्रधारांना जनता मतपेटीतून उत्तर देणार : परब

सावंतवाडी : मी कोणावरही व्यक्तिगत टीका करत नाही त्याप्रमाणे व्यक्तिगत केला महत्त्व देत नाही. माझा लढा कोणाच्याही विरोधात नसून गोरगरीब जनता, माझ्या मायमाऊली, बेरोजगार युवावर्ग आणि परिवर्तनासाठी जीव तोडून लढा देणारे कार्यकर्ते या सगळ्यांसाठी आहे. जनतेसाठी लढण्यापासून मला प्रवृत्त करण्यासाठी अनेक ऑफर देण्यात आल्या, धमक्याही देण्यात आल्या. मात्र मी सत्ताधाऱ्यांच्या दबावाला शरण आलो नाही. जेव्हा योद्धा शरण येत नाही तेव्हा तो बदनाम केला जातो हे आपणा सर्वांना माहीत आहे. माझा जनतेवर आणि जनतेचा माझ्यावर असणारा विश्वास अतूट आहे, मी जनतेच्या घरातील उमेदवार आहे. असल्या बदनामीच्या पेड मोहिमांमुळे आमच्या नात्यावर कोणताही परिणाम होणार नाही म्हणूनच असल्या बदनामीकारक आरोपांना उत्तर देण्यात मी माझा वेळ फुकट घालवणार नाही. अशी प्रतिक्रिया विशाल परब यांनी दिली.
यांच्या षड्यंत्राला आणि बदनामीमागच्या सूत्रधारांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनताच उत्तर देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

rapan bottom