मालवण येथील सभेला युवा वर्गाचीही लक्षणीय उपस्थिती असणार
युवासेना तालुका संघटक मंदार ओरसकर यांनी व्यक्त केला विश्वास
मालवण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण येथे 13 नोव्हेंबर रोजी जाहिर प्रचार सभा होत आहे. ही सभा निष्ठावंत शिवसैनिक आ. वैभव नाईक यांच्या विजयाचीच सभा असेल. मोठया उपस्थितीत होणाऱ्या या सभेत युवावर्गाची लक्षणीय उपस्थिती असेल.
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोकणाला झुकते माप दिले. त्यांचे कोकणवार नेहमीच प्रेम राहिले आहे. तोक्ते वादळात नुकसानग्रस्ताना मोठी मदत त्यांनी दिली. कोरोना काळात पालकां प्रमाणे सेवा दिली.
महाराष्ट्राच्या विकासासाठी ठाकरे शिवसेना नेहमीच झटत राहिली आहे. पक्षप्रमुख प्रत्येकाला आपल्या घरातील सदस्य वाटतात. त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी ठाम राहिली. महाविकास आघाडी राज्यात सत्तेत येणार.
हाच विश्वास व्यक्त करण्यासाठी मालवण येथील सभेला मोठया संख्येने उपास्थिती असेल. आ. वैभव नाईक यांच्या विजयाच ही सभा ठरेल. असा विश्वास मंदार ओरसकर यांनी व्यक्त केला आहे.

